तरुणाच्या खूनप्रकरणी एकास आजन्म कारावासाची शिक्षा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर शहरानजीक असणाऱ्या ढोलेवाडी येथील तरुणाच्या खूनप्रकरणी कारागृहात अटकेत असलेला मुख्य आरोपी विनायक गणपत भोर यास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश संजीव शर्मा यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. इतर चार जणांना प्रत्येकी दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
दि. २० ऑगस्ट २०१४ रोजी मुलीच्या एकतर्फी प्रेमाच्या कारणावरून विनायक भोर याने मुलीच्या भावाचा शहरातील पेटिट महाविद्यालयाजवळ चाकूने भोसकून खून केला होता. त्यावेळी विनायक भोर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच इतर चार जणांवर इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या घटनेचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी व पोलीस हवालदार राजू गायकवाड हे करत होते. त्यांनी या सर्व आरोपींना अटक केली होती. त्यानंतर त्यातील चार जणांना जामीन मंजूर झाला होता. तर विनायक भोर हा अटकेत होता.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या खून खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजीव शर्मा यांच्या समोर झाली. त्यात सरकारी पक्षाच्या वतीने १० साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. त्यात नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गौतमी, फिर्यादी निलेश ढोले, प्रथमदर्शी साक्षीदार योगेश ढोले व नामदेव कुळधरण यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी भक्कम पुरावे न्यायालयास सादर केले. त्यानंतर न्यायाधीश संजीव शर्मा यांनी मुख्य आरोपी विनायक गणपत भोर यास आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ३० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा वर्षे अतिरिक्त कारावास तर ज्ञानेश्वर मच्छिंद्र ढोले, मुकुंद भारत ढोले, प्रसाद भारत ढोले, सागर शंकर ढोले या तिघांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.