महिलेला मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांच्यावर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्‍यातील घारगाव शिवारात जमिनीची पोलीस बंदोबस्तात मोजणी चालू असताना मध्येच येऊन “तुम्ही जमिनीची मोजणी का करता? ती आमच्या मालकीची आहे,’ असे म्हणत दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी सुनीता बापूराव पालकर (रा. काष्टी, वय 30) यांच्या फिर्यादीवरून जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे यांच्यासह अन्य सहा व्यक्तींविरुद्ध बेलवंडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत पालकर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, पालकर या काष्टी येथे पती व मुलासह राहतात. घारगाव येथे पालकर यांची आई सुभद्राबाई व वडील अर्जुन कळमकर राहतात. फिर्यादी पालकर यांना भाऊ नाही. घारगाव शिवारात गट नं. 208 व 224 मध्ये वडिलांची चार एकर वडिलोपार्जित जमीन आहे.

या जमिनीवर बाळासाहेब तुकाराम साळुंके (रा. घारगाव) यांनी कब्जा केला आहे. याबाबत फिर्यादी पालकर यांनी आई सुभद्राबाई यांच्या नावाने न्यायालयात खटला दाखल केला. यामध्ये निकाल कळमकर यांच्या बाजूने लागला. निकालानंतर कळमळर यांनी शासकीय फी भरून मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त घेतला.

शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भूमी अभिलेख विभागाच्या व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी सुरू होती. यावेळी फिर्यादी सुनीता पालकर, आई सुभद्राबाई व वडील अर्जुन कळमकर आणि मामाचा मुलगा गणेश भिवसेन झेंडे उपस्थित होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू असताना जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे, बाळासाहेब तुकाराम साळुंके, सारिका बाळासाहेब साळुंके, तुकाराम साळुंके यांच्यासह अन्य तिघे हातात काठ्या व दगड घेऊन तेथे आले. “या क्षेत्राची मोजणी का करता ? ती आमच्या मालकीची आहे,’ असे म्हणत शिवीगाळ करीत दमदाटी सुरू केली. 

यानंतर फिर्यादी कळमकर यांनी आलेल्या व्यक्तींना न्यायालयाच्या निकालाची प्रत दाखवून आम्ही कायद्याप्रमाणे मोजणी करीत असल्याचे सांगितले. मात्र, आलेल्या व्यक्तींनी “तुम्ही येथून निघून जा’ म्हणत फिर्यादी कळमकर व कुटुंबीयांवर दगडफेक सुरू केली. 

दत्तात्रेय पानसरे व बाळासाहेब साळुंके यांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी मामाचा मुलगा गणेश झेंडे व पती बापूराव पालकर सोडविण्यास आले असता त्यांनाही अश्‍लील भाषेत शिवीगाळ करून शेतातून हाकलून दिले व “तुम्ही पुन्हा मोजणी करायला आला तर तुमचा काटा काढू,’ अशी धमकी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.