बेघरांना अवघ्या ५० हजारांत हक्काचे घर उपलब्ध करुन देणारा प्रकल्प राहुरीत साकारणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असणारा राज्यातील पहिला भव्य गृहप्रकल्प राहुरीत साकारणार आहे. दोन एकरापेक्षा जास्त जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, या प्रकल्पाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली असून या प्रकल्पात अवघ्या ५० हजार रुपयात घर मिळणार आहे, अशी माहिती राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
रमाई आवासा योजनेतून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. सर्व्हे नंबर ४२२ मध्ये तीन मजली इमारतीमध्ये २१० घरे बांधणार असल्याचे नगराध्यक्ष तनपुरे यांनी सांगितले. तीनशे स्क्वेअरफुट बांधकाम असलेल्या घरामध्ये दोन रुम असतील. एक रेशनकार्ड धारकाला एक घर देण्याचे नियोजन आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
प्रत्येक लाभार्थीसाठी तीन लाख रूपये खर्च येणार आहे. त्यामध्ये ५० हजार रूपये लाभार्थिंनी भरावयाचे आहेत. नियोजित वसाहतीमुळे अरूंद रस्ते असलेल्या लक्ष्मीनगर भागातील नागरीकांना हक्काचे घर मिळणार आहे, असे माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांनी सांगितले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.