नगरमध्ये तरुणाची प्रेमविरहातून गोळी झाडून आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विळद पाण्याच्या टाकीजवळ प्रेम प्रकरणातून अमृतलाल पाल ( वय ४२ ) या तरुणाने स्वतःला गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि.२५ रोजी सकाळी घडली.

अमृतलाल दुखीराम पाल (वय ४२, रा.अलाहाबाद, उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या त्या तरूणाचे नाव आहे. पाल हा तरूण संबंधित महिलेवर गेल्या अनेक वर्षांपासून एकतर्फी प्रेम करीत होता. तो या महिलेला भेटण्यासाठी अलाहाबादवरुन विळद येथे येत होता. संबंधित महिलाही उत्तरप्रदेशातीलच असून, ती तिच्या पतीसोबत विळद येथे राहत होती. तर तिचा पती एमआयडीसीत काम करीत होता.

या महिलेवर पाल या तरूणाचे एकतर्फी प्रेम होते. शनिवारी दि.२५ रोजी पाल हा संबंधित महिलेला भेटण्यासाठी आला होता. त्याने संबंधित महिलेला विळद येथील पाण्याच्या टाकीजवळ बोलावले. तेथे त्या महिलेने त्याला नकार दिला. त्यामुळे या तरुणाने स्वत:वर गोळी झाडली आणि लगेच दुसरी गोळी त्या महिलेवर झाडली. 

मात्र, ती गोळी महिलेच्या पायावर लागली. त्यामुळे ती वाचली तर पालने स्वत:वर झाडलेली गोळी त्याच्या छातीत घुसली. त्यामुळे काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. ही माहिती एमआयडीसी पोलिसांना समजताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.