पाथर्डी बाजार समितीचे संचालक गायकवाड यांच्यावर खुनीहल्ला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत गायकवाड यांच्यावर शुक्रवारी दुपारी पाथर्डी- नगर रस्त्यावर शनिमंदिराजवळ खुनीहल्ला झाला. गायकवाड यांच्यावर कुऱ्हाडीने वार करणारा देवीदास शंकर काळे स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाला. यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
माणिक दौंडी येथील संपत गायकवाड शुक्रवारी पाथर्डी न्यायालयात कामानिमित्त आले होते. न्यायालयातील काम संपवून गायकवाड मोटारसायकलवरून नगर रस्त्याने जात होते. या वेळी आरोपी शनिमंदिराजवळ काळे दबा धरून बसला होता. 

गायकवाड हे ज़वळ येताच काळे याने हातातील कुऱ्हाडीने गायकवाड यांच्यावर सपासप चार वार केले. यामुळे गायकवाड जमिनीवर कोसळले. प्रतिकार करताना काळे याची कुऱ्हाड गायकवाड यांच्या हाती लागली. यामुळे काळे पळत पोलिस ठाण्याकडे गेला. रक्तभंबाळ झालेले गायकवाड.हे कुऱ्हाड घेऊन स्वत:च्या मोटारसायकल वरून पोलिस ठाण्यात गेले. व कुऱ्हाड पोलिसांकडे दिली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
पोलिसांनी गायकवाड यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार करून गायकवाड यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. काळे स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. गायकवाड व काळे यांच्यात यापूर्वीही किरकोळ वाद झाला होता. 

दोघांनीही एकमेकांच्या विरोधात अर्ज दाखल केलेले आहेत. पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, संपत गायकवाड यांच्यावर हल्ला झाला आहे. देवीदास शंकर काळे रा. माणिकदौंडी पोलिसांत स्वत: हजर झाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.