सरकार व विरोधी पक्षनेते कारखानदारांचे प्रतिनिधी .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकच धोरण ठेवत या हंगामापासून ऊसाला किमान ३ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने लावून धरली आहे. 'सहकार वाचवा, शेती वाचवा, घामाचा दाम द्या आणि शेतकरी वाचवा', या चार मुद्यावर ऊस उत्पादक शेतकरी चार डिसेंबरला ऊस दरासाठी लोणी येथील सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे डॉ. अजित नवले यांनी दिली. सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यभर उभारण्यात येणाऱ्या लढ्याची माहिती दिली. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
डॉ. नवले यांनी आंदोलनाची भूमिका विषद करताना सरकार, कारखानदार आणि कारखानदारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांवर जोरदार टिका केली. हे आंदोलन कुणा एका व्यक्ती किंवा कारखानदाराविरुद्ध नसून, राज्यभरातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'कारखान्यानिहाय वेगवेगळी पहिली उचल देण्याचे धोरण तत्काळ रद्द झाले पाहिजे. त्यासाठी हे आंदोलन आहे. चार डिसेंबरला लोणी येथे सहकारमहर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बेमुदत उपोषला सुरूवात होईल. सोलापूर, बीड, औरंगाबाद, नाशिक, पुणे व परभरी या जिल्ह्यांमध्ये त्याचवेळी शेतकरी महापडाव आंदोलन सुरू करतील. हे आंदोलन प्रेरणा देणाऱ्या जागेत सुरू होईल.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
सरकार व विरोधी पक्षनेते कारखानदारांचे प्रतिनिधी.
केंद्र सरकारच्या आधारभूत किंमतीसाठी मध्यस्थी करण्याचे अधिकारी राज्य सरकारला आहेत. ऊस दर नियंत्रण समिती देखील दर निश्चित करू शकते. असे असताना मुंबई येथील बैठकीत सरकार, ऊस दर नियंत्रण समिती व विरोधी पक्षनेते यांनी शेतकऱ्यांच्या मागणी विरोधात भूमिका घेतली आहे. हे आमच्या शेतकऱ्यांचे दुर्दैव्य असल्याची प्रतिक्रिया डॉ. अजित नवले, बाळासाहेब पटारे व अजय बारस्कर यांनी यावेळी व्यक्त केली. भांडवलदारांना खुश करण्यासाठी सरकार साखरवरचे दराचे नियंत्रण हटवले जात नसल्याचा आरोप देखील डॉ. नवले यांनी यावेळी केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.