विद्यार्थ्यांकडून सुरू असलेली ध्वजदिन निधीची सक्तीची वसुली थांबवा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर शहरातील विविध विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांकडून ध्वजदिन निधी संकलन करण्यासाठी शालेय प्रशासनाने विद्यार्थी रस्त्यांवर, रहदारीत अक्षरशः दारोदार भटकंतीसाठी पाठवल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली आहे. गटविकास अधिकारी एम.के.जाधव यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली व केतन खोरेंच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
विद्यार्थी अक्षरशः रस्त्यांवर, दारोदार भटकंती करून पैसे गोळा करतात अशा वेळी एखादा अपघात झाला व विद्यार्थ्यांना इजा पोहचली तर याची जबाबदारी आपण अथवा संबंधित विद्यालय घेणार का ? असा थेट जाब यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी विचारला. गेल्या काही वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनामुळे काही वर्षे विद्यालयांनी ध्वजदिन निधीसाठी विद्यार्थ्यांची पिळवणूक व भटकंती बंद केली होती. यावर्षी मात्र पुन्हा हे सुरू करण्यात आली. त्वरित सर्व विद्यालयांना सूचना करण्याचे आश्वासन यावेळी गटविकास अधिकारी जाधव यांनी दिले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

सोमवार दि.२७ नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांकडून सुरू असलेले ध्वजदिन निधी संकलनची सक्ती बंद न केल्यास संबंधित विद्यालयांत मुख्याध्यापकांच्या दालनात कटोरा आंदोलन करणार असल्याचे यावेळी युवक नेते केतन खोरे, शहराध्यक्ष निरंजन भोसले, सोहेल शेख,सैफ पटेल,भैया भोसले,धनराज कोकाटे,अक्षय मोकळ,भूषण मुंजाळ, जुबेर शेख, शुभम चोथवे, शुभम कुलकर्णी, राहुल पटारे, वसीम शेख, अरुण बुऱ्हाडे, राहुल महाजन, स्वप्नील भोंगे यांनी स्पष्ट केले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.