आगामी निवडणुकीत परिवर्तन अटळ -नगराध्यक्ष प्राजक्‍त तनपुरे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर येऊन 3 वर्ष झाली. 3 वर्षाच्या कालावधीत सरकारकडून जनतेचा भ्रम निरास झाला असून 2019 च्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. हे परिवर्तन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी तालुक्‍यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम यापुढे केले जाईल, असा विश्‍वास नगराध्यक्ष प्राजक्‍त तनपुरे यांनी व्यक्‍त केला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
राहुरी येथील युवक कार्यकर्ते राजेंद्र बोरकर यांची जिल्हा युवक राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांना या निवडीचे पत्र नुकतेच देण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस अजित कदम होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमृत धुमाळ, शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, लिगल सेलचे ऍड. राहुल शेटे आदी उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

नगराध्यक्ष तनपुरे म्हणाले की, 2014 मध्ये माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर मी अपक्ष म्हणून राहुरी नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणुकीत निवडून आलो. याकाळात हे प्रकार घडले असले तरी आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील प्रेम कधीही कमी झालेले नव्हते. आज देशातील युवकांना राजकारणात समाजकारणात शरद पवार यांचे मार्गदर्शन अतिशय मोलाचे आहे. त्यांचा आदर्श घेण्यासारखा देशात कोणी नेताच नाही, असे त्यांनी आधोरेखित केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.