स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष केल्याने सरपंच पद गमावले !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्वच्छता अभियानाला शासन स्तरावरून जाहिरात, प्रबोधन व सक्ती अशा विविध पद्धतीने राबविले जात असताना ग्रामीण भागातील लोक अजून ही त्यास गांभीर्यने घेत नसल्याने कर्जत तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मंगल खरात यांचेवर पद गमावन्याची नामुष्की आली आहे.----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
कर्जत तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मंगल अनिल खरात यांचे कडे गावातील घरात संडास नसल्याची तक्रार हनुमंत कारभारी पारखे यांनी जिल्हाधीकारी यांचेकडे केली होती त्यावर दोन्ही बाजूचा युक्तीवाद येकुण निर्णय देताना खरात यांचे सदस्यत्व रद्द केले आहे त्यामुळे त्यांचे सरपंचपदच गेले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सौ मंगल खरात या आपल्या कुटुंबीयांसह टाकली खंडेश्वरी ग्राम पंचायत हद्दीत राहतात. निवडणुकीचा अर्ज दाखल करताना त्यांनी खंडाळा ग्राम पंचायतचा शौचालय असल्याचा दाखला जोडला होता त्या निवडूनही आल्या व खंडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी त्यांची निवड ही झाली. 

सरपंच झाल्यावर त्यांनी गावातच राहणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे केले नाही गावात घर नसल्याने व त्यांचे नावावर शौचालय नसल्याने त्यांनी गावात सहा महिन्याचे आत शौचालय बांधकाम करने गरजेचे असताना त्यांनी या अत्यंत महत्वाच्या व शासनाच्या मुख्य लक्ष असलेल्या विषयाकडेच दुर्लक्ष केले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

याबाबत पारखे यांनी रीतसर तक्रार केली त्यावरून जिल्हाधिकारि यांनी 16 नोव्हे 17 रोजी तक्रारदाराचा विवाद अर्ज मंजूर करून खरात यांचे गोयकरवाडा (खंडाळा) येथील सदस्यपद रद्द केले.याबाबतचे आदेश ग्रामसेवक नवनाथ गायकवाड यांनी गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांना पत्र देऊन याबाबत पुढील मार्गदर्शन मागवले आहे.

शासन प्रत्येक गावात एनकेन मार्गाने शभर टक्के प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असताना गावचे मुख्य व्यक्तिनेच शासनाच्या महत्वकांशी योजनेकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम म्हणून खंडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच खरात यांना आपले पद गमवावे लागले आहे. 

यावरून प्रत्येक गावातील नागरीकाने बोध घेऊन स्वतःचे शौचालय बांधने किती आवश्यक आहे हे स्पष्ट होत आहे. जर असे शौचालय नसेल तर त्या व्यक्तीला शासकीय लाभापासून वंचित ठेवन्यापर्यंत शासन निर्णय घेऊ शकते हेच या निर्णयाने सिद्ध होत आहे.

कर्जत तालुक्यातील 50 गावे ही १०० टक्के हागणदारीमुक्त झाले असून उर्वरित फक्त 40 गावामध्येही खूप थोडे काम राहिले आहे. त्याकडे सर्वानी जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास ते त्वरित पूर्ण होईल व त्यासाठी आम्ही सर्वतोपरीने प्रयत्न करत असल्याचे यावेळी गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.