नितीन आगे खून खटल्यातील ९ आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन राजू आगे याची प्रेमप्रकरणातून हत्या झाली होती. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डब्ल्यू हुड यांच्यासमोर झाली. न्यायालयाने या खटल्यातील नऊ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या खटल्याची माहिती अशी की, दि. २८/४/२०१४ रोजी जामखेड.तालुक्यातील खर्डा येथील नितीन राजू आगे या तरुणाची प्रेमप्रकरणातून गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह झाडाला लटकावून, त्याने आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला होता. 

दरम्यान मयत नितीन याचे वडील राजू आगे यांनी दि. २८/४/२०१४ रोजी दुपारी ४.३० वा. जामखेड पोलिस ठाण्यात जाऊन नितीन याने आत्महत्या केल्याची खबर दिली. त्यानुसार जामखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर दि. २९/४/२०१४ रोजी पहाटे राजू आगे यांनी सचिन गोलेकर व इतरांविरुद्ध खूनाची फिर्याद दिली. 

या गुन्ह्याचा तपास जामखेड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी केला. सुरुवातीला तिघांविरुद्ध संशय व्यक्त करण्यात आला होता. तपासामध्ये पोलिसांनी एकूण १३ आरोपी निष्पन्न केले. यापैकी ३ आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना न्याय व विधी विभागाकडे सोपवण्यात येऊन १० आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
सुरुवातीला या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश देव मॅडम यांच्यासमोर झाली. त्यानंतर या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डब्ल्यू. हुड यांच्यासमोर झाली. या खटल्याची सुनावणी दि. २१/११/२०१६ रोजी सुरू होऊन त्यात एकूण २६ साक्षीदार तपासण्यात आले. 

या खटल्याची सुनावणी सुरू असताना आरोपी साईनाथ येवले हा मयत झाला. दरम्यान न्यायालयाने या खटल्यातील आरोपी सचिन गोलेकर, नीलेश गोलेकर, शेषराव येवले, सिद्धेश्वर गोलेकर, संदीप शिकारे, विनोद गटकळ, भुजंग गोलेकर, विलास ढगे आणि राजकुमार गोलेकर (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) या आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. 

या खटल्यात सरकारपक्षातर्फे ॲड. आर. के. गवळी यांनी तर आरोपीतर्फे ॲड. माणिकराव मोरे, ॲड. प्रकाश गटणे, ॲड. महेश तवले यांनी काम पाहिले. नितीन आगे खून खटला संपूर्ण जामखेड तालुक्यासह जिल्ह्यात गाजला होता. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.