विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रस्त्याने पायी जाणाऱ्या पीडित मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधशी व्ही. जी. मोहिते यांनी आरोपी अमोल अर्जुन गुंजाळ (रा. कसबेवस्ती, पाईपलाईन रोड, अ. नगर) याला दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, दि. १२ जानेवारी २०१३ रोजी अल्पवयीन मुलगी सोनानगर चौकातून ढवणवस्तीकडे पायी जात असताना आरोपी अमोल गुंजाळ व निलेश तागड व एक अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी तु आमच्या बरोबर चल असे म्हणाले असता तीने नकार दिला. 

यावेळी आरोपी अमोल गुंजाळ याने खिशातून ब्लेड काढून तिच्या डाव्या हातावर जखमा केल्या. तसेच कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. घटनास्थळी लोक जमा होताच तिघे आरोपी घटना स्थळावरून पळून गेले. याबाबत संबंधित मुलीने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलिसांनी करून सदरचे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांचे समोर झाली. सरकारपक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. 

सरकारपक्षाचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गुंजाळ याला दोषी धरून भादवि कलम ३५४ (अ) व लहान मुलांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम प्रमाणे दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, भादंविकलम ३२४ व ५०४ अन्वये प्रत्येकी एक वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या दंडापैकी तीन हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा न्यायालयाने आदेश केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.