पुन्हा भाजपचे कमळ फुलणार नाही - कळमकर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सर्वसामान्य जनतेत भाजप सरकार विरोधी तीव्र असंतोष असल्याने पुन्हा भाजपचे कमळ फुलणार नाही.असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी केली. तसेच गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील विधानसभेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असल्याच्या मुंबईच्या बैठकीत निर्णय झाल्याचे सुतोवाच त्यांनी केले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
शासनाकडून फसवी कर्जमाफी, फसव्या योजना, बेरोजगारी, आरक्षणाबाबत टोलवाटोलवी यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवार दि.२७ नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यालयात कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

या आंदोलना निमित्त राज्यातील विविध जिल्ह्यात तालुकास्तरावर मोर्चे काढून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहेत. मात्र नगरमध्ये कोपर्डी प्रकरण व शेवगाव गोळीबार प्रकरणाच्या दृष्टीकोनाने दि.२१ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश असल्याने मोर्चे न काढता तालुकास्तरावर कार्यकर्ते तहसीलदारांना मागण्यांचे निवदन देवून शासनाला भावना कळविणार आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, कैलास वाकचौरे, राजेंद्र फाळके, कपिल पवार, काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, निर्मलाताई मालपाणी,शारदा लगड, राजेंद्र कोठारी, दत्ता वारे, दादासाहेब पठारे, शिवाजीराजे गाडे, दादा गंडाळ, नवनाथ साळुंके, गहिनीनाथ (दादा) दरेकर, कैलास नेमाणे, सुरेश ताके, गणेश ठाणगे, अजित कदम आदिंसह सर्व तालुकाध्यक्ष, आखाडी प्रमुख व युवक तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.