श्रीगोंद्यात विवाहितेस जाळून मारल्याप्रकरणी सासरच्यांविरूध्द गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील २७ वर्षीय विवाहिता वैशाली विकास नागवडे, हिला पती,सासू व सासरा या तिघांनी २१ नोव्हेंबर २०१७ च्या रात्री बारा ते साडे बारा वाजता जाळून मारले. सासू व सासरे यांनी तिचे हातपाय जखडले आणि पतीने रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. अशी फिर्याद मयत वैशाली हिचे वडील रामदास नानासाहेब लगड (रा.शिरसगाव बोडखा ता.श्रीगोंदा) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार श्रीगोंदा पोलिसांनी भा. दं. वि.कलम ३०२, ४९८ ( अ) व ३४ प्रमाणे गुन्हा र.नं. आय ७७२ /२०१७ ने दाखल करून घेतली आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत लगड यांनी या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी मुलगी वैशाली हिचा ६ डिसेंबर २००७ रोजी वांगदरी येथील विकास भिकाजी नागवडे याच्याबरोबर विवाह करून दिला. पहिली दोन वर्षे तिला व्यवस्थित नांदविले. पण मूलबाळ होत नसल्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु केला. जीप घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपयांची मागणी केली. यासाठी पती विकास भिकाजी नागवडे, सासरे भिकाजी वामन नागवडे आणि सासू शालन भिकाजी नागवडे. हे सर्व मारहाण करून उपाशी ठेवत. 

१२ मे २००९ रोजी वरील कारणास्तव या लोकांनी तिला मारहाण करून घरातून हाकलून दिले. त्यावेळी तिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भा. दं. विधान कलम ४९८ (अ) , ३२३, ५०४,५०६, ३४ अन्वये पती, सासू व सासरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा नोंदवून न्यायालयात पाठविलेला आहे. दरम्यान पती विकास याने वैशालीच्या विरोधातही घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
वरील दोन्ही प्रकरणात नातेवाईकांनी तोंडी तडजोड करून तिला सासरी पाठविले. नंतर तिला (आदित्य) मुलगा झाला. मात्र परत पैशासाठी तीचा छळ सुरु झाला. मारहाण करून पुन्हा माहेरी हाकलून दिले. वैशाली व तिचा मुलगा आदित्य यांनी सन २०१४ मध्ये सासरच्या लोकांविरुध्द हिस्से वाटपाचा दावा दाखल केला. त्यामुळे पती विकास याने नमते घेऊन तडजोड करण्याची विनंती केली. आम्ही वैशाली हिला सासरी पाठविले दीड वर्षापूर्वी तिला दुसरा मुलगा झाला. परंतु तिचा छळ सुरूच होता. 

दि.२१ नोव्हेंबर २०१७ च्या रात्री १२ ते १२: ३० सुमारास ढोकराई येथील साठे वस्तीवरील तिच्या राहत्या घरात सासू व सासऱ्याने तिला घट्ट धरून ठेवले. आणि पती विकासने रॉकेल ओतून पेटवून दिले. त्याच दरम्यान यवत येथे कामानिमित्त गेलेला माझा थोरला मुलगा गणेश रामदास लगड हा परत येत होता. एवढ्या रात्री ढोकराई येथे गर्दी पाहून तो थांबला. 

त्यावेळी वैशालीचे सासू व सासरे ढोकराई वरून वांगदरीकडे जाताना त्याला दिसले. वांगदरीचे काही लोक तिथे उभे होते. काय झाले म्हणून त्याने लोकांना विचारले. त्यावेळी वैशालीच्या घराकडे लोकांनी बोट केले. तो तिथे गेला त्यावेळी जळालेल्या अवस्थेत वैशाली त्याला म्हणाली, सासू व सासऱ्याने मला धरून ठेवले आणि नवऱ्याने रॉकेल ओतून पेटवून दिले. हे सांगितल्यानंतर ती बेशुध्द झाली. तिला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती मरण पावली. ही सर्व हकीगत गणेशने आम्हाला फोनवर सांगितली.

वैशाली तीला होत असलेल्या त्रासाबद्दल वेळोवेळी सांगत होती. नवरा, सासू व सासरे गुप्तपणे काहीतरी बोलत असतात. अशेही तिने सांगितले होते. माझ्या जीवाला धोका आहे. तुम्ही काही तरी निर्णय घ्या, अशी मला ती त्याच दिवशी म्हणाली होती. सात,आठ दिवसात बैठक घेऊ, म्हणून मी तिला सांगितले होते. आर्थिक फायद्यासाठी नवरा, सासू आणि सासरा यांनी संगनमताने माझ्या मुलीला पेटवून देऊन तिला ठार मारले असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी रामदास लगड यांनी केली आहे. 

पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपी पती विकास भिकाजी नागवडे याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.