जयहिंदच्या प्रयत्नांतून 5 वर्षात 500 उद्योजकांसह 25 हजार रोजगार निर्मीती - सत्यजीत तांबे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिक्षण घेवून ही तरुणांना नोकरी मिळत नसल्याने सध्या रोजगार निर्मीती हेच आपल्या सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे. याबाबत सातत्याचे चर्चा होत असते. मात्र कोणतीही ठोस अशी कृती होत नाही. म्हणून यावर मात करण्यासाठी जयहिंद युवा मंचच्या वतीने अ.नगर येथे युवा उद्योजकता विकास केंद्र, युथ इन्क्युबेशन सेंटर ची स्थापना करण्यात आली असून या केंद्रामार्फत पुढील 5 वर्षात टप्प्या टप्प्याने 500 उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्टे असून त्यामधून प्रत्यक्ष व अप्रतत्यक्ष 25 हजार रोजगार निर्मीती करण्याचे प्रयत्न करणार असल्याची माहिती जयहिंद युवा मंचचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
युवकांसाठी रोजगार निर्मीतीबाबत माहिती देतांना ते पुढे म्हणाले कि, मागील पंचवीस वर्षात अहमदनगर जिल्ह्यात एकही मोठा उद्योग सुरु झाला नाही. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळाला नाही. आहे त्या उद्योगांमध्ये अ‍ॅटोमायझेशन मुळे कामगार कपात होत आहे. सगळीकडे भरती बंद आहे. एकीकडे जिल्ह्यात नवीन उद्योग येत नाही तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात युवक व युवती विविध प्रकारचे व्यावसायीक शिक्षण घेवून बाहेर पडत आहे. इंजिनिअरींग, तंत्रनिकेतन, फार्मसी, पदवीधर बेरोजगार होत आहे.

घरोघरी इंजिनिअर झाले आहेत. नोकर्‍या नसल्यामुळे युवकांमध्ये मोठी नैराशा निर्माण झाली आहे. यावर वेळेतच ठोस उपाय करण्यासाठी जयहिंद युवा मंचच्या वतीने युवक व युवतींसाठी उद्योजकता विकासाचे इन्क्युबेशन सेंटर अ.नगर येथे सुरु करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांत हा रोजगार निर्मीतीचा उपक्रम आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ग्रामीण भागात प्रथमच अ.नगर शहरात हे केंद्र सुरु होणार आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यामध्ये देशातील व राज्यातील विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन युवकांना मिळणार आहे. या इन्क्युबेशन सेंटर मधून 2023 पर्यंत टप्प्या टप्प्याने 500 युवा उद्योजक तयार होणार असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष 25 हजार रोजगार निर्मीती होणार आहे. यामध्ये तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन, कर्जव्यवस्था, अनुकुल व्यवसाय, मार्केटींग, उत्पादकता, जागा याबाबत मार्गदर्शन व पाठपुराव्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

तरी या युवक व युवतींना उद्योग व्यवसायाची आवड आहे त्यांनी सत्यजीत तांबे यांचे कार्यालय कालिकाप्राईड, चौथा मजला, लाल टाकी, अहमदनगर येथे दिंनाक 30 नोव्हेंबर पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज करावे. त्यामधून छाननी करुन योग्य व पात्र युवक व युवतींची पहिली बॅच निवडली जाणार आहे. यानंतर पुढील काळात टप्प्या टप्प्याने 500 युवक उद्योजक या केंद्रामार्फत तयार केले जाणार आहे. तरी या उपक्रमाचा जास्तीत जास्त युवक व युवतींनी लाभ घेवून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जयहिंद युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.