श्रीरामपूर शहरातील प्रमुख चौकात लवकरच सीसीटीव्ही बसवणार-आदिक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर शहरातील जनतेला अपेक्षित असलेले सुरक्षित शहर दृष्टीक्षेपात ठेवत शहरातील प्रमुख चौक लवकरच सीसी टीव्ही कॅमे-याने सुरक्षित केले जाणार असून आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या १० लक्ष रकमेस नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याचे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील सुरक्षा, चैन स्नॅचिंग, गाड्यांची चोरी,लूटमार,दुकानफोडी रोखण्यात काही प्रमाणात यश मिळावे म्हणून सीसी टीव्ही कॅमेरे लावावेत अशी जनतेची मागणी होती. त्यासाठी शहर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने शहरातील प्रमुख चौकांची पाहणी करण्यात आली. आ.भाऊसाहेब कांबळे यांनी तात्काळ त्यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाखांचा निधी दिला. 

त्यास नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातून मान्यता मिळाली. सीसी टीव्ही बसवून श्रीरामपूर सुरक्षित व्हावे यासाठी लोकसहभागाची नितांत आवश्यकता असून सोमवार दि.२७ नोव्हेंबर २०१७ रोजी सायं.०४.०० वा., यशवंतराव चव्हाण सभागृह, नगरपरिषद येथे आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
या बैठकीस शहरातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, विविध बँका, पतसंस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, विविध संस्था, सामाजिक मंडळे यांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्याधिकारी सुमंत मोरे यांसह सर्व नगरसेवकांनी केले आहे.

मागील सत्ताधाऱ्यांच्या फक्त घोषणाच, कृती मात्र शून्य असल्याचे पुन्हा एकदा उघड
दरम्यान गेल्या काही वर्षांपूर्वी विविध निवडणुकांच्या तोंडावर शहरात सीसी टीव्ही लावणार असल्याच्या घोषणा मागील सत्ताधारी करायचे प्रत्यक्षात मात्र निधी उपलब्ध करणे, जिल्हाधिकारी कार्यालयातून मान्यता घेणे त्यांना जमलेच नाही. म्हणजे या घोषणा मतांच्या राजकारणासाठी वापरून हवेतच विरल्या जायच्या हे उघड झाल्याने सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करूनच नगराध्यक्षा अनुराधा आदिक व सहकाऱ्यांनी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा केल्याने 'ये लडकी कुछ अच्छा कर दिखायेगी' अशी सकारात्मक चर्चा सध्या नागरिक करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.