त्या’ घोड्याचे दुर्दैव..मंत्र्याच्‍या गाडीला धडकून उपचाराअभावी मृत्‍यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मंत्र्यांच्या सरकारी गाडीवर घोडा उधळल्याने गाडीचे नुकसान झाले. पोलिसांनी घोड्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली. मात्र, घोड्यावर उपचारांसाठी कोणतीही मदत केल्याने त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदासाठी पोलिसांचे पत्र नसल्याने डॉक्टर शवविच्छेदन करत नाहीत, अशी स्थिती आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
मंगळवारी नगर-मनमाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मंगल कार्यालयातील लग्न समारंभास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांची गाडी रस्त्यावर उभी होती. याचवेळी दुसरा नवरदेव मिरवण्यासाठी घोडा रस्त्यावर आला. दरम्यान, याचवेळी तेथे आलेल्या ट्रक चालकाने गर्दी असल्याने हॉर्न वाजवला. आवाजाने घोडा उधळून मंत्र्यांच्या गाडीवर जाऊन आदळला.

त्यामुळे गाडीचे नुकसान झाले घोडाही गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घोडामालकावर तातडीने गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची पोलिसांनी दाखविलेली तत्परता घोड्यावर उपचारासाठी मात्र दाखविली नाही. गरीब असलेला घोडा मालक घोडयास घेऊन उपचारासाठी डाँक्टरकडे गेले मात्र पोलीस केस असल्याने डाँक्टरांनी वेळ काढुपणा केला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता डॉक्टरांनी उपचार केले. मात्र तोपर्यंत घोड्याने प्राण सोडले होते. उपचारात विलंब झाल्‍यामुळे मुळे घोड्याचा अंत झाला. त्यात शेवटच्या विधीला सतराशे विघ्न आल्याने घोडे मालकास कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.