‘अंबालिका’ कारखान्या विरोधात आंदोलनाचा इशारा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-अंबालिका कारखान्याने उसाचे मागील वर्षीचे अंतिम पेमेंट अद्याप दिलेले नसून ते तातडीने शेतकऱ्यांना द्यावे तसेच या वर्षीचा भाव ३ हजार ४०० रुपये जाहीर करावा; अन्यथा, आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून संघटनेचे नेते अशोक जगताप, जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक, संजय तोरमडल, भाऊसाहेब सुपेकर, अशोक सरकाळे, कांतिलाल माळवदकर, आबा काळे, मनु गुंड, सुभाष भगत यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

निवेदनामध्ये शेतकरी संघटनेने म्हटले आहे की, कर्जत तालुक्यामध्ये अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये कर्जतसह इतरही अनेक तालुक्यांतील शेतकरी ऊस गाळपासाठी आणतात. या कारखान्याचे व्यवस्थापन मंडळ दरवर्षी उसाला सर्व कारखान्यांपेक्षा जादा भाव देऊ असे जाहीर करतात; मात्र, प्रत्यक्षात तसा शब्द पाळत नाहीत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
मागील वर्षी २०१६-१७ मध्ये सुरुवातीचा हप्ता २ हजार ५५० रुपये दिला होता. यानंतर १५० रुपये दुसरा हप्ता दिला होता. एकून २ हजार ७०० रुपये एवढेच पैसे दिले अद्याप अंतिम हप्ता दिलेला नाही, की अवघ्या दोन हजार ७०० रुपयांवरच बोळवण केली आहे, हे जाहीर करावे. 

मागील वर्षी राज्यातील काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रतिटन तीन हजार ५०० रुपयांपर्यंत भाव दिलेला आहे, मग आपण का देत नाही, या कारखान्याच्या काट्यामध्येदेखील आम्हाला संशय येत आहे. या कारखान्यामध्ये राज्यातील मोठ्या नेत्याचा सहभाग आहे, असे असतानाही शेतकऱ्यांना भाव का देत नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.