प्रेस क्लबच्या वतीने वाहतुक सुरक्षिततेच्या नियमांची जनजागृती.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-रस्ता सुरक्षा हा महत्त्वाचा विषय बनला आहे. यावर केंद्र सरकार सातत्याने काम करत असून, येत्या वर्षभरात मोटार वाहन कायद्यात बदल होणार आहे. वाहनांचा वेग वाढल्याने धोके वाढले आहेत. वाहतुक सुरक्षिततेचे नियम पाळून जनतेच्या सुरक्षिततेची सेवा आपल्या हातून घडणार असल्याची भावना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी व्यक्त केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व प्रेस क्लबच्या वतीने वाहतुक सुरक्षितता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. या कार्यक्रमांतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनधारकांना वाहतुक नियमांचे पालन करण्याची सामुदायिक शपथ देण्यात आली. नव्याने रुजू झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी वाहतुक सुरक्षितता जनजागृती उपक्रम राबवून, कामाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली. 

याप्रसंगी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी मधुकर वाघमारे, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सुर शेख, महेश महाराज देशपांडे, मोटार वाहन निरीक्षक राजेश आहुजा, सुनिल देशमुख, सहा. मोटार वाहन निरीक्षक फैरोज शेख, विनोद घनवट, समीर शेख, राजू कुलकर्णी, बाबा सुर्यवंशी, दिलीप कुलकर्णी, रमेश भोसले, राजू वाघमारे, अनिल तळेकर, अनिल ससाणे, मनोज मेहेर आदिंसह वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
पाटील पुढे म्हणाले की, रस्ते, वाहन, वेग, सुरक्षा यंत्रणेमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. एवढेच नव्हे तर चालक वर्ग देखील बदलला आहे. सध्या कमी वेळेत सर्वांना इच्छित स्थळी पोहचण्याची घाई झाली आहे. वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने जे नियम बनवले ते पाळणे गरजेचे आहे. 

शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात आहे. हे बदल घडविण्यासाठी स्वत:पासून सुरुवात झाली पाहिजे. जीव मोलाचा असून, घरातील कर्ता पुरुष अपघातात गेल्यास तो संसार उघड्यावर येत असल्याचे ते म्हणाले.तसेच यावेळी पाटील यांचे प्रेस क्लबच्या वतीने स्वागत करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.