अटक केलेल्या दहा शेतकऱ्यांना 18 पर्यंत कोठडी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-ऊसाला 3 हजार 100 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी घोटण व खानापूर येथे झालेल्या आंदोलनप्रसंगी संतप्त जमावांनी पोलीसांवर व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. जाळपोळ करुन पोलीसांना जिवे मारण्याचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याच्या केलेल्या प्रयत्नामुळे शेवगाव पोलीसात पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी विविध कलमान्वये 17 जणांविरुध्द बुधवारी 4.30 च्या सुमारास गुन्हा दाखल करुन 10 जणांना ताब्यात घेतले होते. आज त्यांना शेवगावचे सहदिवानी न्यायाधीश आलेवार यांच्यासमोर उभे केले असता त्यांना शनिवार दि.18 पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
दरम्यान, बुधवारी रात्री उशीरा नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक विनयकुमार चोबे व पोलीस अधीक्षक डॉ. रंजनकुमार शर्मा यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात येवून घटनेचा माहिती घेवून तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यात विशाल दिनकर थोरात, भरत अशोक थोरात, गणेश अरुण थोरात, दिनकर भाऊसाहेब थोरात, ज्ञानेश्वर दत्तात्रय भिडे (पाच जण- राहणार खानापुर), सुनील मुरलीधर राठोड (निरखेडा तांडा,जि.जालना), बाळासाहेब धोंडीराम काकडे, जालिंदर बाळासाहेब काकडे, राजेंद्र रामभाऊ काकडे (तिघे राहणार-गदेवाडी), कल्याण लक्ष्मण थोरात (रा. कऱ्हेटाकळी), या दहा आंदोलकांना अटक केली आहे. तर दिनकर गोविंद बोबडे (रा. खानापुर), बाबुराव भानुदास दुकळे, उद्धव विक्रम मापारी (दोघे जखमी व राहणार तेलवाडी, ता. पैठण), राम गोरे, जालिंदर गोबरे, रावसाहेब लवांडे, अण्णा चौधरी यांचा मोठा मुलगा या सात सह 400 ते 500 आंदोलकांविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
फिर्यादीत या जमावाने बंदोबस्तात असलेल्या पोलीस वाहन चालकांना पेटते टायर गाडीवर टाकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शासकीय मोटार सायकल क्रमांक एम.एच 16 एन 257 जाळून नुकसान करुन सरकारी कामात अडथळा आणला. बंदोबस्तात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दगडफेक करुन सरकारी वाहनांचे नुकसान केले असे नमुद करुन भादवि कलम 143, 147, 148, 149, 307, 341, 435, 337, 338,425, महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विरुपणास प्रतिबंध क्र.3.7 प्रमाणे या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस उपअधिक्षक सुदर्शन मुंडे यांनी आर.सी.पीच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार प्रथम आश्रुधुर- सी.एल.- 2, ब्लॅंक राऊंड – 2, शॉंर्ट गण – 7, प्लॅंस्टीक राऊंड – 3 असे फायर अशी कारवाई करण्यात आली.या घटनेमध्ये पोलीस उपविभागीय अधिकरी सुदर्शन मुंडे, शेवगावचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, सुरेश सपकाळे, हे. कॉं. एम.वाय सय्यद, पो,कॉं, पंचमुख, जी.बी पवार, जी.आर गांडगे (तिघे नगर मुख्यालय) आणि नायब तहसिलदार भानुदास गुंजाळ हे जखमी झाले आहेत. पोलीसांनी काठ्या जप्त केल्या आहेत.फिर्यादीत 11 लाखाचे नुकसान झाल्याचे नमुद केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.