डॉ. विखेंच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत रक्तदान शिबीर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-डॉ. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना, साईआश्रम नंबर १ येथे दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक प्रशांत कोते यांनी दिली.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
शिबिराचे उद्घाटन पद्मश्री विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख मान्यवर नगराध्यक्षा योगिता अभय शेळके, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहाणार आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यावेळी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. याबाबत कोते यांनी सांगितले की, ना. राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा संघटना काम करते. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, कोजागिरी पौर्णिमा, गरजुवंतांना मदत तसेच विविध सामाजिक उपक्रम वर्षभरात राबविले जातात. जलक्रांती अभियानास आर्थिक मदत संघटनेच्या वतीने देण्यात आली होती. डॉ. विखेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात जास्तीस जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन कोते यांनी केले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.