घरभाडे दिले नाही म्हणून महिलेचा विनयभंग.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-एक महिन्याचे थकलेले घरभाडे दिले नाही, म्हणून हात धरून महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार लोणी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. नगर- मनमाड रस्त्यालगत राहाणाऱ्या एका विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नवीन घर बांधले म्हणून जुने घर भाडोत्री दिले होते. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
भाडेकरू संभाजी बारकु पारे याने ते एक महिन्यापूर्वी रिकामे केले होते. दि. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पारे हा टीव्हीची डीश काढण्यासाठी आला, तेव्हा त्याच्याकडे भाड्याचे राहिलेले ५०० रुपये मागितले, त्यावेळी त्याने हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्यानंतर पतीसोबत पारे याच्या घरी गेलो असता त्याने विटाने स्वत:च्या डोक्यात मरून घेतले व माझ्या मुलांना गाडीने उडवून देण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून पारे याच्याविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एस. फुलारी करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.