आम्ही कोणाकडे जात नाही. जाणार नाही. ज्यांना यायचे आहे, त्यांचे स्वागत - अनिलभैय्या राठोड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आम्ही कोणाकडे जात नाही. जाणार नाही. ज्यांना यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे, असे सांगून शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे २ डिसेंबरला नगर दौऱ्यावर येत असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. आदित्य ठाकरे यांची प्रोफेसर कॉलनी चौकात दुपारी बारा वाजता सभा होणार असून, त्याचे स्वागत युवा सेनेत दाखल झालेले राज्याभिषेक सामाजिक प्रतिष्ठानचे रवींद्र वाळके आणि युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड हे करतील, असे देखील त्यांनी सांगितले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
अनिलभैय्या राठोड म्हणाले, 'आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राज्यभर संघर्ष केला आहे. विद्यापीठांना त्यांचे जाचक निमय देखील बदलावे लागले आहेत. राज्य सरकारला अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडले आहे.' त्यामुळे शिवसेनेच्या युवा सेनेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. युवा सेनेच्या माध्यमातून काम करण्यांचे स्वागत आहे. सावेडी उपनगरातील राज्याभिषके सामाजिक प्रतिष्ठानचे रवींद्र वाकळे हे देखील याच दिवशी युवा सेनेत प्रवेश करत आहेत. त्यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्ते असणार आहे, असे राठोड यांनी सांगितले.

शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केडगाव उपनगरातून शिवसेनेत दाखल झालेले हर्षवर्धन कोतकर यांना देखील याच दिवशी पद जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शिवसेनेत येण्यासाठी उत्सुक असलेले नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपर्कात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
दीड हजार वाहनांचा ताफा असणार : वाकळे.
भगवं वादळ काय असतं, हे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी दाखवून देऊ, असं रवींद्र वाकळे यांनी यावेळी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या स्वागताच्या रॅलीला मोटारगाड्या आणि दुचाकी अशा मिळून सुमारे दीड हजार वाहने असतील. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौक हा भगव्या झेंड्यांनी सजवून टाकू. प्रत्येक वाहनाला भगवा झेंडा असणार आहे. रॅलीत सुमारे पाच ते सहा हजार कार्यकर्ते असतील आणि सभेला जिल्हाभरातून कार्यकर्ते येणार असल्याचे वाकळे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अमृतच्या कामाचे उद्घाटन.
आदित्य ठाकरे यांचा दौरा झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील महिन्याभराच्या आत दौरा असल्याचे संकेत अनिलभैय्या राठोड यांनी दिली. यावेळी महापालिकेच्या शंभर कोटी रुपयांच्या अमृत योजनचे उद्घाटन होईल, असे त्यांनी सांगितले. उद्धव व आदित्य ठाकरे यांचे हे दौरे नगर शहराला नवसंजीवनी देऊन जातील, असा विश्वास अनिलभैय्या राठोड यांनी यावेळी व्यक्त केला. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.