कालवा निरीक्षकास १५०० रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंद्यात आज लाचलुचपत विभागाने कुकडी पाटबंधारे उपविभाग क्र.५ अंतर्गत येणाऱ्या व कुकडी सिंचन शाखा आढळगाव येथे कार्यरत असणारे कालवा निरीक्षक मारुती महादू खामकर (वय ५१ वर्षे) यांना तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर असलेले काही क्षेत्र हे कुकडी कालवा पाण्याच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखला देण्यासाठी १५०० रुपयांची लाच घेताना आज रंगेहाथ अटक केली आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुकडी पाटबंधारे उपविभाग क्र५ च्या अंतर्गत येणारे कुकडी सिंचन शाखा आढळगाव येथे कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मारुती महादू खामकर. यांनी श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथील तक्रारदाराकडे त्याच्या वडिलांच्या नावे असलेले तांदळी दुमाला येथील गट नं १३२ मधील ९१ आर, हे क्षेत्र कुकडी कालवा पाण्याचे लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखला देण्यासाठी, आज बुधवार दि.२२ रोजी १५०० रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यानुसार उपविभागीय अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्र.५ श्रीगोंदा यांच्या कार्यालयासमोर तक्रारदाराकडून सदर लाचेची रक्कम स्वीकारताना मारुती खामकर यांना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रंगेहाथ पकडले. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथील पोलिस उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलिस निरीक्षक शाम पवरे,तन्वीर शेख, सुनील पवार, एकनाथ आव्हाड, नितीन दराडे, प्रशांत जाधव, महिला पोलीस कर्मवारी राधा खेमनर, चालक अंबादास हुलगे आदी सहभागी झाले होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात सातत्याने असे लाचखोर अधिकारी, कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकत असले, तरी लाचखोर शासकीय कर्मचारी मात्र यातून कोणताही बोध घेताना दिसत नाहीत. त्यामुळेच शासकीय काम करण्यासाठी जर अशाप्रकारे कुणी शासकीय अधिकारी,कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधन्याचे आवाहन लाचलूचपतचे पोलिस उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.