जामखेडमध्ये कुंटणखान्यावर छापा, स्वत:च्या मुलीलाच अवैध व्यवसायास पाडले भाग !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-जामखेड शहरामध्ये एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून या कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेस अटक केले. या महिलेस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच येथील दोन मुलींची सूटका करून त्यांना स्नेहालयात ठेवण्यात आले आहे. मात्र कुंटणखान्याचा मालक पसार झाला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत जामखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडे शहरातील एका ठिकाणी जबरदस्तीने अनेक दिवसांपासून अवैध व्यवसाय चालत असल्याबाबत अर्ज आला होता. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवून तेथे अवैध व्यवसाय चालत असल्याची खात्री केली.

त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, पोहेकाँ बापू गव्हाणे, पोना बढे, पोकाँ केकाण,महिला पोकाँ जगताप, यांच्या पथकाने रात्री १०.३० वा आरोपीच्या हाडोळा येथील घरी छापा टाकला असत. त्या ठिकाणी दोन मुली व या व्यवसायास लागणारे साहित्य, रोख रक्कम ६०० रूपये आढळून आले. कुंटणखाना मालकीनीला पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु मालक यूसुफ शहा पळून गेला. सदर पीडित मुलींची चौकशी करून पोलिसांनी स्नेहालय येथे सुधारण्यासाठी ठेवले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
शहरातील संबंधित ठिकाणी यूसुफ शहा व अटक केलेली ती महिला हे दोघे अनेक दिवसांपासून कुंटणखाना चालवत होते. सदर आरोपी महिलेची स्वत:ची व सोलापूर जिल्ह्यातील मोडलिंब येथील एका मुलीस या दोघांनी राहत्या घरात बंदिस्त करून स्वत:च्या फायद्यासाठी कुंटणखाना चालवत होते व त्यातून मिळणाऱ्या पैशावर उपजीविका करत होते. 

यातील पीडित मुलींकडून जबरदस्तीने अवैध व्यवसाय करून घेतला जात होता. यासाठी त्यांना अनेक वेळा मारहाणही केली जात होती. जामखेड शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय चालत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.