डॉ.प्रकाश कांकरिया मारहाण करणार्यास ६ महिने सक्तमजुरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-डॉ.प्रकाश कांकरिया यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून महादेव परसराम भगत (रा. कापूरवाडी, ता.नगर) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के.एस. नावंदर यांनी भादंवि कलम ४४८ अन्वये दोषी धरून ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, दि. १८/१२/२००८ रोजी दुपारी ४.४५ वा. सुमारास महादेव भगत हा पत्नीचे डोळे तपासण्यासाठी डॉ. प्रकाश कांकिरया यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेथे त्यांच्या पत्नीस तपासणी फी १०० रु. स्वागत कक्षात मागणी केली असता, त्याचा राग धरून चिडून महादेव भगत याने स्वागत कक्षातील टेलिफोन फेकून दिला. आणि शिवीगाळ करीत डॉ. प्रकाश कांकिरया यांच्या केबिनमध्ये घुसून डॉ.कांकरिया यांना मारहाण केली. याबाबत डॉ. कांकरिया यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
या खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एस. नांवदर यांच्यासमोर झाली. यात सरकारपक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सरकारी पक्षाच्या साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून आरोपी महादेव भगत याला भादंवि कलम ४४८ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न दिल्यास १ महिना साधी कैद, कलम ३२३ अन्वये सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक महिना साधी कैद, तसेच कलम ४२७ प्रमाणे एक महिना, सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. 


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.