कोपर्डी बलात्कार प्रकरणी तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राज्याला हादरवून टाकणार्या कोपर्डी बलात्कार आन हत्याकांड प्रकरणाचा आज अखेर फैसला झाला. तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज तीनही आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना फाशीची शिक्षा सुनावली.

--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://tinyurl.com/nagarnews ह्या लिंकवरून .
--------------------------------

१३ जुलै २०१६ रोजी सायंकाळच्या सुमारास कोपर्डी गावात नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. तिच्या चुलतभावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. मुख्य आरोपीला पळून जाताना पाहिल्याचे फिर्यादित म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याला अटक केली. नंतर संतोष भवाळ नितीन भैलुमे यांनाही या गुन्ह्यात अटक करण्यात अाली.

क्रूर पद्धतीने पीडितेवर अत्याचार करून तिचा खून झाल्याने संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी तीन महिन्यांत दोषारोपपत्र तयार करून २० ऑक्टोबर २०१६ रोजी न्यायालयात दाखल केले. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्याविरुद्ध बलात्कार, खून करणे, पॉस्को कायद्यानव्ये दोष ठेवण्यात आले, तर इतर दोन आरोपींविरुद्ध छेडछाड संगमनताने कट रचण्याचे दोष ठेवण्यात अाले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सरकार पक्षातर्फे पाच महिन्यांत ३१ साक्षीदार तपासले. मुख्य आरोपीच्या वतीने वकीलपत्र घेण्याचा ठराव नगरच्या वकील संघटनेने केला होता. त्यामुळे त्याची बाजू मांडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने अॅड. योहान मकासरे यांची नियुक्ती करण्यात आली. दुसरा आरोपी संतोष भवाळ याच्या वतीने अॅड. बाळासाहेब खोपडे, अॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी काम पाहिले. तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्या वतीने अॅड. प्रकाश आहेर यांनी काम पाहिले.

या खटल्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी केला. तर विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्जल निकम यांनी न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. खटल्यात सरकारी पक्षाने 18 साक्षीदार तपासले. आरोपींच्या वतीने 1 साक्षीदार तपासण्यात आला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.