बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे अडीच महिन्यांपूर्वी बलात्कार झालेली अल्पवयीन मुलगी उपचारादरम्यान दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी तिच्या राहत्या घरी मुच्र्छा अवस्थेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ८ सप्टेंबर २०१७ रोजी राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे पप्पू अनिल चिकने (रा.खडकवाडी, ता. पारनेर) याने त्याच्याच नात्यामधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती.

घटना घडल्यानंतर आरोपी याने स्वत: तिच्या आईला फोन करुन 'तुमची मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे' सांगितले. यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी तिला खडकवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले. दुसऱ्या दिवशी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केले. सदर मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे अडीच ते तीन महिने उपचार घेऊनही सदर मुलीची प्रकृती सुधारत नव्हती. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

घरची परिस्थिती नाजूक असल्याने तिच्या आई-वडिलांना तिचा दवाखान्याचा खर्च पेलवणे अवघड जात असल्याने दि.१८ नोव्हेंबर २०१७ रोजी मुलीला शेरी चिखलठाण येथील घरी आणले. मात्र, पूर्णपणे मुच्र्छा अवस्थेत असलेल्या सदर मुलीने २० नोव्हेंबर रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पप्पू अनिल चिकने याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पू चिकने हा गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून तुरूंगात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.