मला राजकारणापेक्षा समाजकार्याची मोठी आवड - अक्षय कर्डिले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मला राजकारणापेक्षा समाजकार्याची मोठी आवड आहे. मी राजकारणापेक्षा विकासकामांना अधिक महत्व देतो. प्रत्येक गावाला आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळून गावचा विकास व्हावा, त्यासाठी मीदेखील कामांचा पाठपुरावा करण्याचे काम सातत्याने करत असल्याचे प्रतिपादन युवानेते अक्षय कर्डिले यांनी केले आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
नगर तालुक्यातील खोसपुरी येथील पिसाळवस्ती नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी शाळेच्या उद्घाटनप्रसंगी कर्डिले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठनेते भीमराव आव्हाड होते. या वेळी अक्षय कर्डिले म्हणाले, आ. कर्डिले यांच्या माध्यमातून प्रत्येक गावचा विकास व्हावा, ही माझ्यासारख्याची भावना आहे. 

त्यासाठी गावातील असणारे प्रलंबित प्रश्न सुचवा, प्रत्येक कामाचा तरुणांनी पाठपुरावा केला पाहिजे. खोसपुरी येथील भिसे, देवकरवस्तीचा सिंगल फेजचा प्रश्न, गावातील स्मशानभूमीच्या पिकअपशेडचा प्रश्न, कॉंक्रिट बंधाऱ्यांचा प्रश्नदेखील निश्चित मार्गी लावू. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

विकासकामांच्या पाठबळामुळेच आ. कर्डिले पंचवीस वर्षे आमदार म्हणून काम करत आहे. यापुढील काळात मीसुद्धा तरुणांचे संघटन उभारून विकासकामांची सोडवणूक करणार असल्याचे अक्षय कर्डिले म्हणाले. प्रास्ताविक सरपंच सोमनाथ हारेर यांनी केले. 

अंगणवाडी इमारतीसाठी संतोष पिसाळ (मेजर) यांनी जागा दिल्याबद्दल त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय भिसे, कचरू देवकर, दाविद भालेराव, आसाराम वाघमोडे, फकीरभाई पठाण, बाळासाहेब काळे, भरत हरेर, संदीस भिसे, शिरीष भिसे, युवानेते गणेश आव्हाड, ठेकेदार उध्दव मोकाटे, अंगणवाडी सेविका सौ. मीना पिसाळ, ग्रामसेवक कांबळे आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.