श्रीगोंद्यात वेशा व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर छापा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वेशा व्यवसाय सुरू असलेल्या शहरातील एका हॉटेलवर छापा टाकून श्रीगोंदा पोलिसांनी ४ महिलांसह ११ ज़णांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ५ हज़ार ९२० रुपये जप्त करण्यात आले. शहरातील दौंड रोडलगत असणाऱ्या हॉटेल सागरवर आज ही कारवाई करण्यात आली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या सूचनेनुसार श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार तसेच परीविक्षाधिन पो. उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस व पो उपअधीक्षक यांच्या पथकाने संयुक्त ही कारवाई केली. 

याबाबतची माहिती अशी की, आज दि. २१ रोजी दुपारी ३ च्या सुमारास पोलिस अधीक्षकांना शहरातील हॉटेल सागरमध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार पो. उप अधीक्षक सोनाली कदम, पो. उप नि. महावीर जाधव, पोकॉ. बोराडे, परीट, धांडे यांचे पथक तयार करून पोकॉ. बोराडे यांना डमी ग्राहक म्हणून पाठवण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

त्यांना त्याठिकाणी वेशा व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हॉटेल सागरच्या मागे सापळा लावला व बोराडे यांनी इशारा करताच पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या वेळी दोन खोल्यांमध्ये ४ महिला व ७ पुरूष आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

या वेळी त्यांच्याकडून ५ हज़ार ९२० रुपये जप्त करण्यात आले. या वेळी हॉटेल मालक दत्तू दगडू कोथिंबिरे, गजानन भुजंगराव ठोंबरे रा. पेडगाव, ता. दौंड, विकी अनिल साळवे, रा. भांडेवाडी (अल्पवयीन), अनिल गोविंद कर्वे रा. शिरापूर, ता. दौंड, प्रदीप कैलास सांगळे रा. शिरापूर, ता. दौंड, रमेश रामदास पोकळे रा. वडगाव, ता. पारनेर. या सर्वांवर श्रीगोंदा पो. ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.