'मंदिरांअगोदर आमच्यावर बुलडोझर फिरवा'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :'हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई होणे कितपत योग्य आहे. नगर शहरात मंदिराबाबत जो सर्व्हे झाला आहे, तो आम्हास मान्य नाही. जी मंदिरे पाडली आहेत, ती पुन्हा उभारली पाहिजे. प्रशासनाने बळाचा वापर करून मंदिर पाडण्याची मोहीम राबविल्यास त्या बुलडोझरला आडवे व्हा. तो आमच्यावर फिरवा', अशी भुमिका घेण्याचे आवाहन, समाज प्रबोधनकार अर्पणा रामतिर्थंकर यांनी केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
शहरातील अनधिकृत मंदिरांवर सुरू असलेल्या महापालिकेच्या कारवाईला मंदिर बचाव समितीचा विरोध सुरूच आहे.बैठकीच्या पार्श्वभूमीवर समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. भजन, प्रवचने, ओव्या, अभंग, भावगीते यावेळी म्हणत आंदोलन झाले. समाज प्रबोधनकार अर्पण रामतिर्थंकर यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

महापालिकेचे आयुक्त तथा अतिरीक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी ही बैठक घेतली. या समितीच्या बैठकीत प्रशासकीय पातळीवर उपायुक्त विक्रम दराडे, नगर रचनाकार संतोष धोंगडे, अतिक्रम विभागाचे सुरेश इथापे, कॅंटोन्मेंट बोर्डाचे अभियंता महेंद्र सोनवणे व स्वच्छता अधिकारी रमेश साके आदी उपस्थित होते. वसंत लोढा, सदाभाऊ शिंदे, नगरसेवक योगीराज गाडे, सुहास मुळे, उबेद शेख, सतीश मैड, अपर्णा रामतिर्थंकर आदिंनी मंदिर पाडण्याच्या मोहिमेस विरोध करत फेर सर्व्हेची मागणी केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

मनपाचा सर्व्हे चुकीचा; न्यायालयाने याचिका स्वीकारली : लोढा .
महापालिकेने केलेल्या सर्व्हे चुक आहे. तो पुन्हा व्हावा. मंदिर पाडण्याची मोहीम घेतल्यास जनतेचा उद्रेक होईल. त्यावेळी सर्वथा जबाबदारी प्रशासनाची राहिल, असा इशारा मंदिर बचाव समितीचे वसंत लोढा यांनी दिला. शहरातील शांततेला तडा जावू न देता, योग्य निर्णय घ्यावा, बळाचा वापर करु नका, तुमच्या बळापेक्षा दैवीशक्ती मोठी आहे, याचे भान ठेवा, असे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, मनपाने केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात समितीने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयात स्वीकारली आहे. त्यामुळे या मुद्यावर आता न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे, असे लोढा यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.