शहरात विकासाला चालना फक्त शिवसेनेमुळे मिळाली - अनिलभैय्या राठोड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरात विकासाला चालना फक्त शिवसेनेमुळे मिळाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रभागात मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून काम करत असल्याचे शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड यांनी सांगितले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
नालेगाव (प्रभाग २२) मधील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा ते नवग्रह मंदिर पर्यंत बंदपाईप गटार व रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भुमिपूजन राठोड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मनपा सभागृह नेता गणेश कवडे, महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती सुनिता मुदगळ, नगरसेवक अनिल बोरुडे, दत्ता मुदगळ, प्रमोद दळवी, गणपतराव राऊत, संजय दळवी, चंद्रकांत कलवडे, राजेंद्र दळवी, अनंत फडके, योगेश पाठक, गिरीश मुळे, विनीत मुंगी, धनंजय पांडकर, संजय नाबरीया, धनंजय पाठक, अ­ॅड.मंगेश दिवाणे, दिनकर देव आदी उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

राठोड म्हणाले, 'उताराच्या दिशेने नालेगावचा परिसर आहे. पावसाळ्यात येथे मोठ्याप्रमाणात पाणी साचते. स्थानिकांची गैरसोय होते. बंदपाईप गटारींमुळे पाणी साचणार नाही. दर्जेदार रस्ता नागरिकांना उपलब्ध होणार आहे.' सभागृह नेतेपदी कवडे यांची निवड झाल्यापासून या भागात विविध विकासात्मक कामे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. महापौर सुरेखा कदम यांनी गणेश कवडे यांच्या पाठपुराव्याने महापौर निधीतून सदर काम सुरु करण्यात आल्याचे सांगितले.

गणेश कवडे यांनी रस्ता खराब झालेला असताना स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा केला. हा रस्ता महापौर निधीतून मंजूर करण्यात आला. बंदपाईप गटारचे काम संपल्यावर फेज दोनची पाइपलाइन टाकून, रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे, असे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.