कोपर्डी निकाल : दोषींना फाशी की जन्मठेप, आज फैसला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे आज स्पष्ट होणार आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात आज या खटल्यातील दुसरा दोषी संतोष भवाळ, याचे वकील शिक्षेवर युक्तीवाद करतील. त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद होईल. त्यानंतर न्यायालय शिक्षा सुनावेल.

मला फाशी नको, जन्मठेप द्या: जितेंद्र शिंदे
कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींना कमीत कमी शिक्षा व्हावी, अशी मागणी बचाव पक्षांच्या वकिलाने केली आहे. या प्रकरणातील मुख्य दोषी जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा करत, फाशीऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचे वकील योहान मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.

नितीन भैलुमेच्या वकिलांचा युक्तीवाद
दुसरीकडे या खटल्यातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमेच्या वकिलांनी आपल्या अशिलाला या खटल्यात गोवल्याचा दावा केला. तसंच नितीन भैलुमे हा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. तो दलित कुटुंबातील आहे. तो 26 वर्षाचा विद्यार्थी असून, त्याचं कुटुंब सर्वसामान्य आहे. त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून आहेत. शिवाय त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमात जास्त शिक्षेची तरतूद नाही. तो केवळ 102 ब कटकारस्थान आणि 109 गुन्ह्याला उत्तेजित करणं या दोनच कलमात दोषी आढळला आहे. त्याच्याविरोधात कोणताही साक्षीदार नाही, कोणी प्रत्यक्षदर्शी नाही, त्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. तो एक सुशिक्षित मुलगा आहे, असा दावा नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अहेर यांनी केला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
उज्ज्वल निकम युक्तीवाद करणार
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज बाजू मांडतील. उज्ज्वल निकम यांनी दोषींना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली आहे.दरम्यान, बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता आज होणार आहे.शिक्षेच्या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर आजही अहमदनगर जिल्हा न्यायालयात कडक बंदोबस्त तैनात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.