कोपरगावात भररस्त्यात विद्यार्थिनीच्या डोक्याला लावली बंदूक !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव शहरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या एका अज्ञात व्यक्तीने सोमवारी सकाळी सहा वाजे दरम्यान सुभद्रानगर परिसरात अडवून डोक्याला बंदूक सदृश्य हत्यार लावले. तसेच मारहाण करून तिचा मोबाइल हिसकून पोबारा केला. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत मात्र पोलिसात दाद ना फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा कसून शोध घेत आहे. गांधीनगर भागातील केपीबी प्राथमिक विद्यालयाचा दरवाजा फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी असफल प्रयत्न केला. 

याबाबतची समजलेली माहिती अशी शहरातील सुभद्रानगर भागात एका शिक्षकाचे शिकवणीचे वर्ग सुरु आहेत. त्यासाठी पहाटे साडेपाच वाजेपासून मुला-मुलींची वर्दळ सुरु होते. रिद्धीसिद्धीनगरकडे जाणा‍ऱ्या या रस्त्यावर दिवसा मात्र तुरळक नागरिकांची ये-जा असते. हेच हेरून अज्ञात व्यक्तीने (दि. २०) पहाटे सहा वाजेच्या दरम्यान दोन विद्यार्थिनींना अडवून त्यातील एकीला पकडून बंदूक सदृश्य हत्यार लावून तिला डोक्यात बुक्का मारला. त्यामुळे विद्यार्थिनीच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या होत्या. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
हे घडत असताना दुसरीने आरडाओरडा केला. मात्र, एकीचा मोबाइल घेताच सदर अज्ञात व्यक्ती पळून गेला. भल्या पहाटे ही घटना घडल्याने मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवायचे की, नाही अशी चिंतेने पालकांना ग्रासले आहे. शहर व तालुक्याच्या परिसरात भुरट्या चोऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. एसएसजीएम कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांंचे मोबाइल हिसकून पोबारा केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.