भाजप सरकारने राज्याला अधोगतीवर नेवून ठेवले - राधाकृष्ण विखे पाटील.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील उंबरी- बाळापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या अपयशी कारभारावर सडकून टीका केली. तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या या सरकारने राज्याला अधोगतीवर नेवून ठेवले असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
राज्यातील शेतक‍ऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आशी मागणी आम्‍ही करत होतो. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर यासाठी मोठा संघर्ष करून सरकारला निर्णय करण्यास भाग पाडले, पण जाचक अटी व नियमात ही कर्जमाफी विनाकारण अडकवून सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात एक दमडीही जमा नाही. खोटी प्रमाणपत्र देवून शेतकऱ्यांचा अपमान या सरकारने केला असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

कर्जमाफीच्या मुद्यावरून येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारला वेठीस धरून या केलेल्या ऐतिहासिक फसवणूकीचा जाब आपण विचारणार असल्याचा इशारा देतानाच शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आणि वेळप्रसंगी न्यायालयीन संघर्षास तयार राहाण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले. हक्काच्या पाण्यासाठी आपला संघर्ष सुरूच आहे, मागील काळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मोठा परिणाम आपल्याला सहन करावा लागला. यंदा पाऊस चांगला झाल्याने भंडारदरा व निळवंडे धरणात पाणीसाठा मुबलक आहे. पाच आवर्तनाचे नियोजन करण्याचा निर्णय झाला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आता ऊसाच्या उत्पादनाचे नियोजन कार्यक्षेत्रात हाती घेतले जाणार असल्याचे स्पष्ट करून विखे पाटील म्हणाले की, गावकी आणि भावकीच्या राजकारणात अडकून राहु नका, सर्व एका विचाराने काम करा. तर वरची मंडळी आपल्‍या विकासाला बाधा आनू पाहत आहेत याकडे त्‍यांनी लक्ष वेधले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.