नंदिनी व अंजलीचे वडिल तथा गुरु यांनी उलगडला त्यांच्या आजवरच्या गायन क्षेत्रातील प्रवास.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :झी सारेगमप लिटील चॅम्प स्पर्धेत विजेती ठरलेली व आपल्या सुरांच्या जादूने अवघ्या भारताला भुरळ घालणारी अंजली गायकवाड हीचा प्रेस क्लबच्या वतीने गौरव करण्यात आला. हॉटेल श्रध्दा येथे झालेल्या प्रेस मिट कार्यक्रमात प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सुर शेख यांनी नंदिनी व अंजली या दोन्ही बहिणींचा सत्कार केला. यावेळी त्याचे वडिल तथा गुरु अंगद गायकवाड व सौ. मनिषा गायकवाड उपस्थित होत्या.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .

प्रास्ताविकात किशोर मरकड यांनी त्यांच्या कुटुंबीयांची पार्श्‍वभुमी स्पष्ट केली. नंदिनी व अंजली यांच्या गायन क्षेत्रातील आजवरचा प्रवास त्यांचे वडिल तथा गुरु अंगद गायकवाड यांनी उलगडला केला. ते म्हणाले की, मुळचे लातूर जिल्ह्यातून सर्वसामान्य कुटुंबातून नगरमध्ये सन 2004 साली आलो. 

शास्त्रीय संगीताचे शिक्षण गुरुकुल पध्दतीने पंडित शांताराम यांच्याकडे घेतले. त्यांचे भाऊ, बहिण यांना संगीताची आवड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरमध्ये कला शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य करुन, संगीताचे क्लास घेतले. शाळेत कला विषय बंद झाल्याने क्लास व मुलांच्या गायनाकडे लक्ष केंद्रित केले. 

मुलांना देखील गायनाची आवड असल्याने त्यांना लहान वयापासूनच गायनाचे धडे द्यायला सुरुवात केली. नंदिनी व अंजली यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून विविध गायनाच्या स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरुवात केला. सन 2015 साली नंदिनीने वयाच्या दहाव्या वर्षी व्हाईस ऑफ इंडिया या क्लासिकल संगीत स्पर्धेत मानाचा समजला जाणारा प्रथम क्रमांक पटकाविला. हे मोठे यश होते. 

ए.आर. रहेमान यांनी अंजलीला चेन्नईच्या स्टुडिओत दिलेली गाण्याची संधी, तर मुंबईच्या स्टुडिओत ए.आर. रहेमान यांच्या बरोबर संगीत रेकॉर्डिंगचा आलेला अनुभव त्यांनी विशद केला. तर झी सारेगमप लिटील चॅम्प स्पर्धेतील आजवरच्या प्रवासाचा उलगडा केला. 

संगीत क्षेत्रात गुरुंची भुमिका महत्त्वाची आहे. या शो च्या माध्यमातून लहान मुलांमध्ये संगीत ऐकण्याचे व गाण्याचे चांगले संस्कार निर्माण झाले. नगरकरांनी मोठी प्रेरणा दिल्याचे सांगत, आपली मुलगी समजून नगरसह संपुर्ण महाराष्ट्रातून भरघोस मत मिळाल्याचे त्यांनी आभार मानले. तसेच गुरु व वडिलांची भुमिका पार पाडताना मुलांच्या डोळ्यात पाणी येवूसतर घेतलेला रियाज तर वडिलकीच्या प्रेमाने मुलांचे पुरविलेले हट्ट यावरील गमती जमती सांगितल्या.

वडिलांकडून मिळालेले संगीताचे बाळकडू, स्पर्धेतील जयेशची मैत्री, बाळपण या विषयावर चर्चा करत नंदिनी व अंजलीने शास्त्रीय संगीतामध्ये करिअर करण्याचा मनोदय व्यक्त केला. शाम तेरी बन्सी पुकारे... व माहेरी.... या गाण्याच्या सादरीकरणाने नंदिनी व अंजलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन अग्रवाल यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.