श्रीेगोंदा तालुक्यातील वाळूतस्करी संपवणार - जिल्हाधिकारी महाजन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीेगोंदा तालुक्यात वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यांच्यावर श्रीगोंदा तहसीलदारांमार्फत मोठी कारवाई सुरू असली, तरी वाळूतस्करांवरील कारवाईबाबत माझ्या तहसीलदारांकडून अजून मोठ्या अपेक्षा आहेत. वाळूतस्करांवर वरवर कारवाई करून उपयोग होणार नाही. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
त्यासाठी पडद्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करत, तालुक्यातील वाळूतस्करी बंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी व्यक्त केले. ते श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या कामकाज आढावा व दप्तर तपासणीच्या कामानिमित्त बुधवारी ते पहिल्यांदाच श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

श्रीगोंदा तहसीलदारांचे चारचाकी वाहन जुनाट झाल्यामुळे ते भंगारात काढल्यामुळे त्यांना दुचाकीवरूनच फिरावे लागत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले असता, श्रीगोंदा तहसीलदारांना लवकरच नवीन चारचाकी वाहन उपलब्ध करून देण्याचे सांगितले. 

मागील काही दिवसांपूर्वीच वाळूतस्करांवर कारवाईसाठी गेल्यावर तहसीलदार माळी यांना वाळूमाफियांनी शिवीगाळ केली होती. त्याबाबत विचारले असता, या वाळूमाफियांची दादागिरी मोडीत काढणार असून श्रीगोंदा तहसीलदारांना यापुढील काळात वाळूमाफियांवर कारवाईसाठी संपूर्ण प्रशासकीय ताकद देणार असल्याचेही ते म्हणाले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
तलाठी कार्यालयातून अनेक प्रकारचे दाखले देने बंद झाल्यामुळे नागरिकासह विद्याथ्र्याना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आनून दिले. यावर हा शासन निर्णय असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे म्हणाले. 

यावेळी श्रीगोंदा तालुका काँग्रेसच्यावतीने अध्यक्ष प्रशांत दरेकर,ॲड.सुनील भोस, माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे,काष्टी ग्रामपंचायत सदस्य मेजर चांगदेव पाचपुते, नवनाथ राहिंज,पोपट बोरूडे यांनी तर युवासेनेच्यावतीने बाळासाहेब दूतारे, हरिभाऊ काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. पत्रकारांच्यावतीने देखील जिल्हाधिकारी अभय महाजन, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांचे स्वागत करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.