देहरे टोलनाका सुरू करण्यास शिवप्रहारचा विरोध.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर ते कोल्हार बिओटी अंतर्गत रस्ता संपूर्ण नादुरस्त असल्याने स्थगित असलेल्या देहरे (ता.नगर) टोल नाक्यावरील टोलवसुली पुन्हा चालू न करण्याबाबत शिवप्रहार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना निवेदन दिले आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर ते कोपरगाव रस्ता संपूर्ण नादुरुस्त झाल्याने देहरे (ता. नगर) येथील पथकर वसुलीस दि.३१/१०/२०१७ रात्री १२ वाजेपासून स्थगिती देण्यात आलेली आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत व त्यायोगे विकसकाकडून होत असलेला अटी-शर्थींचा भंग याबाबत शिवप्रहार संघटनेच्यावतीने दि.१२/१०/२०१७ रोजी सविस्तर पत्र सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व संबधितांना दिले आहे.

सदरील रस्त्याचे पथकर वसुलीस यापूर्वीही अटी-शर्थींचा भंग केल्याने स्थगिती देण्यात आली होती. मात्र संबंधित विकसकाने वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन, तसेच वरिष्ठ स्थरावर अधिकारी व संबधितांशी हात मिळवणी करून पथकर वसुली चालू करून घेतली. मात्र अनुषंगिक रस्त्याचे काम मात्र कधीही केले नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
आता पुन्हा याचीच पुनरावृत्ती करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे. विकासक पुन्हा कोणतेही काम न करता मंत्रालय स्थरावर तडजोड करून पथकर वसुलीस परवानगी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. जनतेच्या हाल अपेष्टांकडे दुर्लक्ष करून दि.३१ ऑक्टो.२०१७ रात्री १२ वाजेपासून पथकर वसुलीस देण्यात आलेली स्थगिती रस्त्याची अपेक्षित देखभाल दुरुस्ती व नुतुनीकरण होईपर्यंत कुठल्याही परिस्थितीत उठवू नये व पथकर वसुलीस परवानगी देऊ नये. 

अन्यथा शिवप्रहार संघटनेच्यावतीने बेकायदेशीर वसुलीस परवानगी देण्याच्या व त्यायोगे जनतेच्या आर्थीक लुटीस जबाबदार सर्व संबंधितांवर अधिकाराचा गैरवापर केला म्हणून या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल व प्रसंगी योग्य त्या न्यायालयात दाद मागितली जाईल असे श्री. भोर यांनी म्हटले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.