कर्जाला कंटाळून पाथर्डीत शेतकऱ्याची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथील सुभाष केरू कर्डिले (वय-४२ वर्षे) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. कर्डिले यांना उपचारासाठी मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच कर्डिले यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. शवविच्छेदन केल्यानंतर मंगळवारी रात्री बारा वाजता आल्हणवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
आल्हणवाडी येथील शेतकरी सुभाष कर्डिले यांच्याकडे बँक व सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज होते. कर्ज फिटत नसल्याने कर्डिले गेल्या अनेक दिवसांपासून निराश होते. शेतीमधील शेतमालाला भाव मिळत नाही. बँकेचे व सोसायटीचे कर्ज कसे फेडायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर होता. 

मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुभाष कर्डिले यांनी स्वत:च्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले. शेजारील शेतकरी व कर्डिले यांच्या पत्नी आशाबाई यांनी त्यांना तातडीने नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, कर्डिले मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
आशाबाई कर्डिले यांचा मंडळ अधिकारी रवींद शेकटकर यांनी बुधवारी जबाब नोंदविला असून, सुभाष कर्डिले यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा अहवाल तहसीलदार नामदेव पाटील यांना दिला आहे. मयत सुभाष कर्डिले यांच्या वारसांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी राधाकिसन कर्डिले यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.