साईसंस्थानच्या बसने उडविल्याने चिमुकली ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रुई- सावळीविहीर रस्त्यावर साईबाबा संस्थानची बस आणि मोटारसायकल यांच्या धडकेत चिमुकली जागीच ठार झाली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुलीचे आई-वडील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
साईबाबा संस्थानची बस सावळीविहीरकडून रुईकडे चालली होती. त्याचवेळी रुईपासून एक किलोमिटर अंतरावर इनामके वस्तीजवळ शिर्डीतील एका हॉटेलमध्ये कर्मचारी असलेले सुभाष पठारे हे पत्नी व दोन मुलींसह रुईकडून सावळीविहीरकडे मोटारसायकलवर दवाखान्यात चालले होते.

यावेळी बस व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यात दीड वर्षांची मुलगी अनुष्का जागीच ठार झाली. तर पठारे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना संस्थानच्या रुग्णवाहिकेत साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला उपचारांसाठी दाखल करण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
आश्चर्य म्हणजे दुसऱ्या मुलीला काहीही झाले नाही. अपघातानंतर संस्थानचे अधिकारी व पोलीस यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर पंचनामा करण्यात आला. अपघातानंतर वाहनचालकाने तेथून पळ काढत थेट पोलीस ठाणे गाठले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.