धुराडे पेटविण्याचे काम मी केले, आता ऊस देण्याचे काम सभासदांचे - डॉ सुजय विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :३०० कोटी रूपयांच्या कर्जाचा बोजा असताना तीन वर्ष कारखाना बंद होता. कामगारांनी आठ महिन्याचे रिपेअरींगचे काम अवघ्या तीन महिन्यात केले. धुराडे पेटविण्याचे काम मी केले. आता ऊस देण्याचे काम सभासदांचे आहे. यावर्षी उस दिला नाही तर पुन्हा कारखाना सुरू करता येणार नाही, असे सुजय विखे म्हणाले. बारागाव नांदूर येथे आयोजित उस उत्पादक शेतकरी मेळाव्यात डॉ़ विखे बोलत होते़ अध्यक्षस्थानी भानुदास कोहकडे हे होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
ऊस उत्पादक शेतक-यांची एफआरपी देणे असताना २२०० सभासदांनी सह्या दिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला तनपुरे कारखाना यंदा ५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. एफआरपी थकीत असताना सुरू होणारा तनपुरे साखर कारखाना राज्यातील पहिलाच कारखाना असणार आहे, अशी माहिती डॉ़ सुजय विखे यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.