स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्यावतीने अभिवादन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारताच्या पंतप्रधान असतांना स्व. इंदिरा गांधी यांनी केलेल्या धोरणात्मक बदलांमुळे सर्वसामान्यांचे जीवन मान उंचविण्यास मोठी मदत झाली. त्यांनी घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांना समोर ठेवून असल्याने त्यांची तळागाळातील लोकांसाठीची तळमळ दिसून येते. त्याचबरोबरच गरीबी हटाओचा दिलेला नारा आणि त्यादृष्टीने उचललेले पाऊल यामुळे देशात अमुलाग्र बदल झाला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
अनुचाचणी, आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लू स्टार मुळे त्यांच्यातील कणखरपणा दिसून येतो. जागतिक पातळीवर देशाचा स्वाभिमान उंचविण्याचे काम स्व. इंदिरा गांधी यांनी केले. त्यांच्या विचारांचे अनुकरण हे सर्वांनी करण्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केले.

माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, उबेद शेख, गौरव ढोणे, निजाम जहागिरदार, फिरोज खान, रिजवान करिम शेख, मार्गरेट जाधव, हारुण इनामदार, अज्जूभाई शेख, प्रेमानंद पाडळे, जमिला शेख, सुनिता साळवे, मयुर पाटोळे, मुस्ताक फारुन खान आदि उपस्थित होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
याप्रसंगी बोलतांना बाळासाहेब भुजबळ म्हणाले, स्व. इंदिरा गांधी यांनी देशाच्या जडण-घडणत मोठे योगदान दिले आहे. देशातील गरीब हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता. तसेच काँग्रेस पक्ष देशातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. 

त्या एक सर्वगुणसंपन्न अशा महान नेत्या होत्या. त्यांची प्रेरणा आजही स्फुर्तीदायी ठरत आहे. याप्रसंगी उबेद शेख, निजाम जहागिरदार, मार्गरेट जाधव, हारुण इनामदार आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव ढोणे यांनी केले तर आभार सुनिता साळवे यांनी मानले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या विविध आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.