मंदिरांसंदर्भात मनपाच्या भुमिकेचा निषेध.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महापालिकेने नगर शहरातील मंदिराबाबतची घेतलेली भुमिका चुकीची आहेच शिवाय केलेले सर्व्हेक्षणही चुकीचे आहे. त्यामुळे चुकीची कारवाई मनपाकडून होत आहे. मनपाने मंदिर पाडण्याच्या कारवाईस सुरुवात केल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसने महानगरपालिकेने फेर सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी करुन वेळोवेळी आंदोलनही केले. मात्र निर्दयी असलेले मनपा अधिकारी यांनी पाडण्याची भुमिका हाती घेतलीच. प्रत्यक्षात महानगरपालिकेने हा निर्णय घेण्याअगोदर नगरसेवकांची महासभा घेऊन नगरसेवकांची मते जाणून घेणे आवश्‍यक होते. मात्र तसे न करता एकतर्फी हा निर्णय घेतल्याने मंदिरासंदर्भात मनपाने घेतलेल्या भुमिकेचा आम्ही निषेध करत आहोत. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
मंदिर बचाव कृती समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते वसंत लोढा व सदाभाऊ शिंदे यांनी या प्रश्‍नाला वाचा फोडली आहे. त्यांच्या उपोषणात सक्रिय सहभागी होवून त्यांच्या भुमिकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. फेर सर्व्हेक्षणची मागणी आजही करत आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणाची शासनाने अजून दखल घेऊ नयेही ही निंदणीय बाब आहे. आता जी मंदिरे पाडण्यापासून वाचली आहेत, ती मंदिरे अधिकृत करण्याकरीता पुढाकार घेणार आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

मंदिर बचाव कृती समितीच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते वसंत लोढा व सदाभाऊ शिंदे यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या 5 व्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसने या उपोषणाला पाठिंबा देत आ.संग्राम जगताप यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक कुमार वाकळे, विपुल शेटीया, अभिजित खोसे, प्रकाश भागानगरे, दिपक सूळ, अजय चितळे, बाबासाहेब गाडळकर, संजय झिंजे, राजेश भालेराव, वैभव ढाकणे, सारंग पंधाडे, बजरंग भुतारे, लकी खुबचंदानी, गुडू खताळ, नितीन लिगडे, गौरव कचरे, दिपक खेडकर प्रशांत ढाकणे, ज्येष्ठ कामगार नेते अविनाश आपटे, हभप शिरिष लहाडे, सुहास मुळा, प्रा.मधुसूदन मुळे आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यावेळी बोलतांना प्रा.विधाते म्हणाले, आ.संग्राम जगताप यांनी मंदिर पाडण्याच्या भुमिकेच्या निषेधार्थ सुरुवातीपासूनच आक्रमक भुमिका घेतली आहे. महानगरपालिकेच्या अधिकारी व पदाधिकार्यांनी शहरातील लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता ही कारवाई सुरु केली आहे, त्यामुळे या कारवाईचा आम्ही राष्ट्रवादीच्यावतीने निषेध करुन असून, मंदिर बचाव समितीला जाहीर पाठिंबा देत आहोत.

वसंत लोढा म्हणाले, शहरातील मंदिर वाचावे व भाविकांच्या भावनांचा विचार व्हावा, यासाठी मंदिर बचाव कृती समितीची स्थापना करुन गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला सर्व स्तरातील नागरिकांनी, सर्व राजकीय पक्षांनी व प्रतिष्ठीत नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या उपोषणाची व्यापकता वाढली आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे मनमानी कारभार करत अत्यंत निर्दयीपणे शहरातील हिंदूंची मंदिरे पाडली आहेत. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी हे या कारवाईचे प्रमुख आहेत. त्यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.