डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नांना यश, अखेर 'तनपुरे' चा बॉयलर पेटणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवार दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता आमदार शिवाजीराव कर्डिले व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी दिली आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत उदयसिंह पाटील यांनी सांगितले, की गेले तीन महिने डॉ. तनपुरे कारखान्याच्या कामगारांसह पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व गणेश कारखान्याच्या कामगारांनी सतत तीन महिने अहोरात्र अथक प्रयत्न करून कारखान्याच्या मशिनरीच्या दुरुस्तीचे काम ९० टक्के पूर्ण केले आहे.

सर्वसाधारण १५ नोव्हेंबरपयंर्त कारखान्याच्या मशिनरीचे १०० टक्के काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आत्तापयंर्त कारखान्याकडे सुमारे १० हजार एकर उसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे कारखान्याने प्रतिदिन गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर प्रती ३५०० ते ३६०० मे.टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. यावर्षी साधारण चार ते साडेचार लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आमचे मार्गदर्शक डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने डोळयासमोर ठेवलेले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
ऊस वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या सुमारे एक हजार बैलगाड्या संपुर्णत: दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत. ऊस तोडणी व वाहतुक कंत्राटदार यांच्याबरोबर करार झालेले आहेत. कितीही उसाची पळवापळवी झाली, तरी कारखान्यास उसाची कमतरता भासणार नाही. 

सभासद व कामगार यांची आत्तापयंर्त चांगली साथ संचालक मंडळास लाभली आहे व यापुढेही त्यांची ही साथ नक्कीच मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. कामधेनू पूर्ववत व्हावी, म्हणून ऊस देण्याची जबाबदारी सभासद पार पाडतील व कामगार आपली जबाबदारी चोख बजावतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

एफ.आर.पी.प्रमाणे आम्ही सभासदांच्या उसाला भाव देण्यास बांधील आहोत; पण यापूढे जाऊन आमचे मार्गदर्शक डॉ. सुजय विखे यांनी सभासदांना दिलेल्या शब्दाप्रमाणे पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्याच्या बरोबरीने भाव देण्यास आम्ही बांधील राहू. खरं तर राहुरीच्या इतिहासातील हा कारखाना सुरू होणे म्हणजे ऐतिहासीक क्षण आहे. 

याची सुरुवात येत्या ७ नोव्हेंबर रोजी होणार असून आमदार शिवाजीराव कर्डिले व डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. यावेळी सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.