गैरप्रकारात सामील लाभार्थी, अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांच्या सबलीकरणाच्या उदात्त हेतूने शासनाकडून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष घटक योजनेत गैरप्रकार करणाऱ्या लाभार्थ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विश्‍वास वैरागर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी राज्य शासनाकडून विशेष घटक योजना राबविण्यात येत होती. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत 2014 ते 2016 या कालखंडात या योजनेद्वारे मागासवर्गीय शेतकऱ्यांना बैलगाडी, बैलजोडीसाठी भरीव अर्थसहाय्याबरोबरच वीज मोटार, सायकल कोळपे, ताडपत्री, स्प्रेपंप, नांगरी, तुषार सिंचन, पाईपलाईन आदी शेती उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले होते.

नगर जिल्ह्यातील 2 हजार 43 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरुन स्पष्ट होत असतानाच सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते विश्‍वास वैरागर यांनी यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप करुन चौकशीसाठी वरीष्ठांकडे पाठपुरावा केला होता. वैरागर यांच्या तक्रारीनुसार नेवासा तालुक्‍यात करण्यात आलेल्या चौकशीत तथ्य आढळून त्यासाठी प्रामुख्याने दोषी आढळलेल्या नेवासा पंचायत समितीतील कृषी अधिकारी साळवे यांना निलंबित करण्यात आले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्यानंतर वैरागर यांच्या मागणीनुसार याच योजनेची जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्‍यात चौकशी पथकांद्वारे करण्यात आलेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली.या योजनेद्वारे लाभ दिल्याचे दिसून येणाऱ्या 40 टक्के बैलगाड्या, बैलजोड्या गायब असल्याचे चौकशी पथकाला आढळून आले.

त्याचप्रमाणे सुधारीत औजारात 45 टक्के, पंप संच 18 टक्के, तुषार सिंचन 4 टक्के, तर 7 टक्के लाभार्थ्यांकडे पाईपलाईन आणि 6 टक्के लाभार्थ्यांकडे ताडपत्री आढळून आलेली नसल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करुन यात अनियमितता झाल्याचे मान्य करत संबंधित लाभार्थ्यांवर कारवाईची शिफारस केली.

मात्र संबंधित चौकशी समितीने केवळ लाभार्थ्यांवरच कारवाई करण्याची केलेली शिफारस ही पुरेशी नसून मागासवर्गिय शेतकऱ्यांच्या सबलीकरणाच्या उदात्त शासकीय हेतूस हरताळ फासणाऱ्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवरही या सिद्ध झालेल्या गैरप्रकाराबद्दल कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वैरागर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.