अंजली व नंदिनी गायकवाडच्या सुरांची मैफील

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्र संगीत सम्राट व सारेगमप लिटिल चॅम्प फेम अंजली व नंदिनी गायकवाड या भगिनी लवकरच आपल्या जादुई सुरांनीं नगकरांना मंत्रमुग्ध करणार आहेत. ‘युवान’ संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्तमाऊली सभागृह येथे येत्या शनिवारी ता. २५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता ‘स्वर संध्या’ हा कार्यक्रम होईल. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
नगरचे नाव महाराष्ट्र व देशात उंचावणाऱ्या अंजली व कुटुंबीयांचा नगरकरांच्या वतीने विविध क्षेत्रातीलमान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमात जाहीर सन्मानही केला जाणार आहे. शास्त्रीय, भक्तीगीत, लावणी इ. सोबत मराठी, हिंदी चित्रपटातील विविध गाजलेल्या गाण्यांचा नजराणा यावेळी अंजली व नंदिनी गायकवाड सादरकरतील. यात ‘सारेगमप’ स्पर्धेत गायलेल्या गाण्यांचाही समावेश असेल . अंजली व नंदिनीचे वडील अंगद गायकवाड हे संगीत संयोजन तर प्रसिद्ध निवेदिका वीणा दिघे ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अंजली व नंदिनी गायकवाड यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी यानिमित्त सामान्य नगरकरांना मिळणार आहे. कार्यक्रमासाठी मर्यादित स्वरूपात पासेस आहेत. पासेससाठी कृपया ‘युवान’ सिद्धी बागेसमोर, सुरवीडिजिटल लॅब, नेता सुभाष चौक अथवा लक्ष्मी फोटो स्टुडिओ, समर्थ शाळेशेजारी, सावेडी येथे दि. २४ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन युवानचे सहसचिव प्रसन्न हेमराज बोरा यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.