विरोधकांशी मी कधीही शत्रुत्वाने वागलो नाही - माजी खा. गडाख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मी राजकारण करत असताना विरोधकांशी कधीच शत्रुत्वाने वागलो नाही. आताचे राजकारणी मात्र तसे वागतात. मी विकासकामांनाच प्राधान्य दिले, असे माजी खा. यशवंतराव गडाख यांनी रस्तापूर येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्केट कमिटीचे सभापती कडूबाळ कर्डिले हे होते. गडाख पुढे म्हणाले, मी माणसं जोडण्याचे काम केले. राजकारण करत असताना ते तेवढ्यापुरतेच करायचे,पुन्हा विकासकामांकडे लक्ष द्यायचे. शिक्षणाला महत्व दिले. समाज जोडण्याचे काम मी केले.

समाजकार्यासाठी आपल्याला आपले उरलेलं आयुष्य घालवायचे आहे. केंद्र सरकारने साखर आयात केली नाही तर साखरेला भाव चांगला राहील. प्रत्येक शेतकऱ्याने उसाची लागवड केली पाहिजे. प्रत्येकाला वाचनाची आवड असली पाहिजे. वाचनाने सुसंस्कृतपणा येतो.गावागावात वाचनालये सुरू केली आहे. 

तसेच गरीब विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा खर्च देखील केला जात आहे, असेही शेवटी गडाख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रस्तापूरचे युवा नेते व मुळा बाजारचे माजी अध्यक्ष अरुण सावंत यांनी केले. रस्तापूर पेयजल योजना मंजूर करण्यासाठी जि.प. सदस्य सुनील गडाख यांनी आम्हाला खास मदत केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यासाठी १ कोटी १३ लाख रुपये मंजूर झाले. स्मशानभूमी वॉलकंपाऊंडसाठी ८ लाख रुपये मंजूर झाले. रस्तापूर-फत्तेपूर रस्त्यावरील पुलाच्या दुरूस्तीचे काम १४ वित्त आयोगातून मंजूर करण्यात आले, असे अरुण सावंत यांनी प्रास्तविकपर भाषणातून सांगितले. 

माजी खा. गडाख यांच्या हस्ते राष्ट्रीय पेयजल योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच वॉलकंपाऊंड व पुलाच्या कामाचेही जि.प.सदस्य सुनील गडाख यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. संत तनपुरे बाबा साहित्य कला सांकृतिक हा पुरस्कार नुकताच पंढरपूर येथे गडाख यांना प्रदान झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.