सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील सासरच्या जाचाला कंटाळून एका २० वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पती, सासरा व दीर या तिघांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी संदीप गंभीरे (वय २०) असे विवाहितेचे नाव आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी (घाटा) येथील दत्तू कारभारी वायभासे यांची मुलगी शुभांगी हिचा संदीप गंभीरेबरोबर फेब्रुवारी २०१६ मध्ये विवाह झाला होता. यानंतर सासरच्यांनी तिला दीड वर्षे सुखात नांदविले. 

त्यानंतर सासरा ज्ञानदेव तुळसीराम गंभीरे, पती संदीप ज्ञानदेव गंभीरे व दीर गणेश ज्ञानदेव गंभीरे (सर्व रा. कौठे मलकापूर) यांनी शुभांगी हिस तुझ्या माहेरहून गाय घेण्यासाठी व कांद्याचे पीक घ्यावयाचे आहे. त्यासाठी दीड लाख रुपये घेऊन ये, असा तगादा सुरू केला. 

त्यानंतर तिने सासरचे लोक पैसे मागत असल्याचे आपल्या वडिलांना सांगितले; परंतु वडील ऊसतोड मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याने त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. त्यामुळे ते एवढे पैसे देऊ शकले नाही. त्यामुळे तिचा सासरी शारिरीक, मानसिक छळ सुरूच राहिला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
माझा सासरा, नवरा व दीर यांनी तुझ्या वडिलांकडून दीड लाख रुपये घेऊन ये, नाहीतर परत येऊ नको, असे दसऱ्याच्या सणाला माहेरी गेल्यानंतर तिने वडिलांना सांगितले. त्यानंतर वडिलांनी ऊस तोडणी मुकादम श्रीपती आमटे यांच्याकडून एक लाख रुपये हात उसने घेऊन तिच्या सासरी पाठविले. 

सासरच्यांनी उरलेले ५० हजार रुपये घेऊन ये, असे तिने दिवाळीच्या सणाला गेल्यानंतर पुन्हा वडिलांना सांगितले. त्यानंतर तिचा भाऊ कृष्णा याने २० हजार रुपये आणून दिले. एवढे पैसे देऊनही त्यांचा तगादा सुरूच राहिला.उर्वरित ३० हजार रुपये घेऊन ये, असे सांगितले; परंतु पैसे नसल्यामुळे त्यांनी तिची समजूत काढली; 

परंतु तुम्ही मला पैसे दिले नाही, तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून टाकीन, असे तिने वडिलांना सांगितले. त्यानंतर वडिलांनी मुलीची समजूत काढून तिला सासरी पाठवून दिले. त्यानंतर दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ रोजी शुभांगीचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती तिचा दीर गणेश गंभिरे याने तिच्या वडिलांना दिली.

याबाबत मयत शुभांगीचे वडील दत्तू वायभासे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन सासरा ज्ञानदेव गंभिरे, पती संदीप गंभिरे व दीर गणेश गंभिरे या तिघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.