जेवणाच्या बिलावरून हॉटेलमालकावर गोळीबार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जेवणाचे पार्सल घेतल्यानंतर बिल मागू नये म्हणून पिस्तुलातून गोळीबार व चाकूचा धाक दाखवित हॉटेल मालकाला मारहाण करण्यात आली. नगर-मनमाड राज्यमार्गावर साकुरी शिवारातील हॉटेल बांबु हाऊस येथे शनिवारी (दि. १८) रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चौघांविरूद्ध राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकारामुळे नगर-मनमाड मार्गावरील हॉटेल चालकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
किशोर चांगदेव दंडवते (रा. गोदावरी वसाहत, ता. राहाता) व अक्षय अप्पासाहेब दाभाडे (वय २५, रा. नांदुर्खी, ता. राहाता) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून दीपक पोकळे व अन्यएकजण पसार आहे. याबाबत अधिक माहिती अशी : शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास आरोपी नगर-मनमाड राज्यमार्गावर साकुरी परिसरात असलेले हॉटेल बांबू हाऊस येथे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी थांबले. 

मात्र, पार्सल घेतल्यानंतर बिल द्यावे लागू नये म्हणून, हॉटेल मालक प्रमोद अण्णासाहेब गाडे यांच्या डाव्या बाजूला दीपक पोकळे व त्याच्या साथीदाराने पिस्तुलातून गोळी झाडली. तसेच चाकूचा धाक दाखवित त्यांना लाथा बुक्क्यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या ठिकाणाहून सर्वजण पसार झाले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सागर पाटील घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पहाणी केल्यानंतर तपासाची चक्रे फिरविली. त्यानंतर किशोर व अक्षय या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. 

दरम्यान, हॉटेल मालकावर अशाप्रकारे दहशत निर्माण केल्यामुळे नगर-मनमाड राज्यमार्गावरील हॉटेल व्यवसायिकांमध्ये दहशत पसरली आहे. याप्रकरणी प्रमोद गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३२/१७ नुसार भादंवि कलम ३९७, आर्म ॲक्ट ४/२५, ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गांगड हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.