अचानक विज प्रवाह सुरु झाल्याने वायरमनचा मृत्यु.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालूक्यातील भानसहिवरे येथील गाडगे महाराज आश्रम शाळेजवळ रविवार (दि.19) रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान विद्युत रोहिञावरील बिघाडाची दुरुस्ती करण्यासाठी विद्युत रोहिञावर दुरुस्ती करत आसलेल्या वायरमन पोपट आसाराम गणगे (वय 38) अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
मृतक वायरमनचे पार्थीव नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान आणण्यात आले.माञ या रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी नसल्याने येथे शवविच्छेदन करता येणार नसल्याची माहीती कर्मचार्‍यांनी मयत गणगे कुटूंबियांना देण्यात आली. 

 पंचायत समिती सदस्य किशोर जोजार, संजूबाबा गायकवाड, सिताराम निपुंगे, बापूसाहेब मोहिटे यांनी वरिष्ठांना या घटनेची माहीती देवून शवविच्छेदन करण्याची विनंती केली.येथील प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ.वसंत जमधडे यांना सामाजिक कार्यकर्ते संजूबाबा गायकवाड यांनी मृतक गणगेचे शवविच्छेदन करण्याची मागणी डॉ.जमधडे यांच्याकडे केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
माञ त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिल्याने जिल्हा सिव्हिल सर्जन यांना सामाजिक कार्यकर्ते गायकवाड यांनी घटनेची माहीती देवून आ. बाळासाहेब मुरकुटे यांना रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी नसल्याचे सांगितल्याने वरिष्ठ पातळीवरुन सुञ हलविण्यात येवून शेवगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ.परदेशी यांनी मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात येवून शवविच्छेदन करण्यात आले.
विद्युत प्रवाह अचानक सुरु कसा झाला? याबाबत सविस्तर माहीती घेवून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य किशोर जोजार यांनी यावेळी बोलतांना दिली.याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.