स्वच्छ भारत अभियानाला जलसंधारणमंत्री राम शिंदेंकडून हरताळ,उघड्यावर लघुशंका व्हिडीओ व्हायरल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्वच्छ भारत अभियान राबवणाऱ्या या भाजप सरकारचे मंत्रीच या अभियानाला केराची टोपली दाखवताना दिसत आहेत. राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी चक्क सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
जलसंधारण मंत्री राम शिंदे हे बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जलयुक्त शिवार योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या मळेगाव  गावातील पाहणी केल्यानंतर पुढच्या दौऱ्यासाठी ते निघाले. मात्र वाटेत एका ठिकाणी त्यांच्या गाडीचा ताफा थांबला, मंत्रीमहोदय गाडीतून बाहेर आले आणि थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जागेवर लघुशंका करू लागले. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

मंत्रीच असं वागत असतील तर स्वच्छ भारत अभियान मोहिमेला तडा बसत असल्याचं जाणकारांचा म्हणणं आहे त्यामुळे राज्यातील मंत्रीच जर या अभियानाला हरताळ फासत असतील तर सर्वसामान्यांच्या वर होत असलेली कारवाई किती योग्य आहे असा सवाल उपस्थित होतो आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.